पान:गुन्हेगार जाती.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० गुन्हेगार जाती. घरच्या बायका भिक्षा घालण्याला आल्या ह्मणजे त्यांच्या अंगावरील दागदागिने ते नीट पाहून ठेवतात. खैरवाड मोठ्या गांवांत तेलें, औषधें, घरोघर विकतांना वरीलप्रमाणें माहिती मिळवून गुन्हे करतात. बौरी लोक दुसऱ्या जातीच्या इसमांकडून बातमी काढीत नाहींत व त्यांना आपल्या कटांतही घेत नाहींत. लुटण्यालायक घरें शोधून ठेविल्यावर टोळी कांहीं मैल कुच करिते, आणि तेथेंही वरीलप्रमाणें आसपासच्या गांवचीं घरें शोधून ठेविते. याप्रमाणें कृष्णपक्षापर्यंत निरीक्षण चालतें. मग ते शोधून ठेविलेल्या घरांपैकी कोणावर तरी अतिशय काळोख्या रात्रीं धाड घालतात. पहिल्याच घरीं चांगला डल्ला मिळाला तर बाकीचीं घरें फोडीत नाहींत. मोठमोठ्या शहरीं तीन तें सहा महिनेपर्यंत देखील मुक्काम करून चांदण्या रात्रीं घरें रोंखणें आणि अंधाऱ्या रात्रीं चोरी करणें, याप्रमाणें एखादी टोळी सपाटा लावते. दुसऱ्याच्या नजरेस न पडतां ज्या घरांत जातां येतें आणि ज्यांतून जलदी बाहेर पडतां येतें, अशा घरीं बौरी चोरी करितात. ज्या घरांच्या भोंवतीं अरुंद रस्ते किंवा बोळ असतात, तेथें ते जात नाहींत. कारण असल्या घरांच्या वाटा अडवितां येतात व गुन्हेगार खोड्यांत सांपडतो. जे मारवाड बौरी बायका मुलांसुद्धां फिरतात आणि ब्राह्मण असल्याचे बहाण्यावर घरकाम पत्करतात, त्यांना घराचा ठाव घेणें, गुप्त मसलती व केलेला बेत पार पाडणें वगैरेंची आयतीच संधि मिळते. मोधियांची घरफोडी करण्याची रीत अशी आहे कीं, एकजण पुढें येऊन ब्राह्मण, राजपूत किंवा खाकी साधु, ( हे अंगाला भस्म चर्चितात, लंगोटी लावतात आणि धुनीजवळ शेकत बसतात.) ह्यांच्या वेषानें एखाद्या शहरांत राहतो, आणि घर शोधून ठेविलें ह्मणजे लांबून आपल्या टोळीला घरफोडीसाठीं बोलावून घेतो. बौरीये बगली पद्धतीनें ग्यान किंवा दौलतीया नांवाच्या हत्यारानें घर फोडतात. तंबू फाडण्यासाठीं, किंवा चालून आलेल्या इसमावर वार करण्यासाठीं नाईक अणीदार सुरी कातड्याच्या किंवा लांकडाच्या म्यानांत घालून आपल्या बरोबर