पान:गुन्हेगार जाती.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

m बौरी किंवा बौरिये. ११७ टोळी गेली असें समजावें. आंकडींत जितक्या उभ्या रेघा तितके पुरुष • टोळीत असतात. वर्तुळ काढून त्याच्यांत टोळींतले इसम दर्शविणाऱ्या उभ्या रेघा काढलेल्या असल्या, म्हणजे असें समजावें कीं, टोळी सुखरूप आहे, ती लौकरच परतणार आहे, आणि तिचा तळ नजीक आहे |||| चौकटीभोंवतीं, कडें काढून त्या कड्यापुढें एक रेघ काढलेली असली, म्हणजे असें समजावें कीं, साथीदार माल - रेघेच्या दिशेला गेले. ( चौकट = घेऊन पेटी). ह्या खुणा स्पष्ट सुमारें एक फूट लांब असून त्या सहज दिसतील, अशा जागीं काढलेल्या असतात. त्या पाहून बौरी शंभर मैलपर्यंत एकमेकांच्या मार्गे जातात. उपजीविकेची बाह्य साधनें:- आपल्या मुलखांत शेती, शेत- काम, सरपण, गवत विकणें वगैरेंवर बौरी लोक पोट भरतात. कांहीं जागले व माग काढणारेही असतात. ह्या इलाख्यांत ते बहुधा भीक - मागतात; आणि कांहीं जण अत्तरें, धातुपौष्टिक औषधे वगैरे विकतात. मोधिये मात्र आगाऊ ठरविलेला गुन्हा करण्यापुरती वाटखर्ची पदरांत बांधून येतात. वेषांतर:- बायकापोरें बरोबर असल्यास गोसाव्याचे वेषानें व सडेपणीं बैराग्याच्या वेषाने ते इकडे येतात. ते कपाळाला भस्म किंवा गोपीचंदन लावतात, तुळशीरुद्राक्षांच्या माळा घालतात, आणि त्यांच्या हातांत चिमटा व कमंडलु असतो. ते भगवी वस्त्रे परिधान क- रितात; व दोघे तिघे मिळून तुळशीदासाचें रामायण पढत बसतात. - कोणी हजामत करतात, कोणी जटा वाढवितात. ते आपल्या नांवा-