पान:गुन्हेगार जाती.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ गुन्हेगार जाती. पुढे दास ( बैरागी ) किंवा गिर ( गोसावी ) असें लावतात. त्यांचीं नांवें दोन असतात. एक आईबापांनी ठेविलेलें व दुसरें गुरूनें ठेविलेलें. पण ते आपलीं नांवें वरचेवर बदलतात. त्यांच्या दंडावर द्वारकेच्या किंवा अयोध्येच्या तप्त मुद्रा असतात. कमाऊ ( नाईक ) गुरु आणि बाकीचे इसम चेले बनतात. ते आपले तळाला " आसन " व टोळीला “ मंडल ” किंवा “ गिरो " म्हणतात. एकंदर टिळाटोपी जेथले तेथें करून ते आणलेल्या सोंगाची बतावणी उत्कृष्ट करतात. परंतु कधीं कधीं भलतीकडे जानव्याची गांठ दिल्यानें, किंवा तिलक लाविल्यानें, किंवा वर्ज्य पदार्थ खाल्ल्यानें त्यांचें बेंड फुटतें. ते बहुधा गांवाबाहेर रहातात; आणि उघड रीतीनें मांस खातात, व दारू पितात. खरे साधु बहुधा आपआपला स्वयंपाक वेगळा करतात. पण बौरिये एकत्र स्वयंपाक करून एका पंक्तींत जेवतात. साधूंच्या मेळ्यांत ठिकठिकाणचे वेगवेगळी भाषा बोलणारे लोक असतात. पण बौऱ्यांचे टोळीत असें कांहींच नसतें. मारवाड बौरिये आपणांला कधीं कधीं संजोगी बैरागी किंवा हिंदुस्थानी ब्राह्मण म्हणवितात, आणि पाणक्याचें वगैरे घरकाम पत्करतात. अशा वेषानें ते वर्षानुवर्ष रहातात, आणि रात्रीं चोऱ्या करतात. कधीं कधीं ते गंगाजलाच्या कावडी घेऊन फिरतात. बदक बौरी, रामनंदी बैराग्यां- चा वेष घेऊन फिरतात. बौऱ्यांचा एक कुलस्वामी असतो. त्यावरून ते ओळखतां येतात. कांहीं गहूं व “ ममरखी " नांवाच्या वेलाच्या तूप लावलेल्या बिया, तांब्याच्या किंवा पितळेच्या डबींत घालतात; आणि ती डबी, एक मोरपीस, व घंटा, हीं सव्वादोन हात लांब, दोन हात रुंद अशा पांढऱ्या रुमालजोडीत गुंडाळून ठेवितात. या वळकटीवर बक- न्याचे रक्ताचा पंजा उठविलेला असतो; आणि ही वळकटी दोन खारवी रुमालांत गुंडाळलेली असते. ते जर इमारतीत उतरले, तर हा देव भिं- तीवर टांगून ठेवितात; आणि मैदानांत उतरले, तर कोणी पुरुष माणूस तो उशाला घेतो. त्याला ते पुरुषाशिवाय किंवा वरिष्ठ जातीच्या हिंदू-