पान:गुन्हेगार जाती.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ गुन्हेगार जाती. कांच्याला “ उपकारे " आणि मोघीयांच्याला " जमादार ह्मणतात. दिल्लीवाल आणि मालपुऱ्यांच्या टोळींत कमाऊ, भंडारी ( स्वयंपाक्या ), कोठारी ( हरकाम्या ), पिटवाडी ( टोळींतील चोरी करणारे लोक ) असे असतात. मालपुरे आणि मोघीये सडे असतात; दिल्लीवालांच्या टोळीबरोबर कधीं कधीं बायकापोरें असतात; आणि बदक, मारवाड, खैरवाड ह्यांच्याबरोबर बायकामुले नेहमी असतात. माणसें व सामान नेण्यासाठीं बदक तवें, गाढवें, गाई, लशी बरोबर नेतात. खैरवाड नुसते बैलच नेतात. मारवाड आणि दिल्लीवाल नुसतीं तच नेतात, आणि मोघ्यांच्या टोळीबरोबर कधीं कधीं एकाददुसरा उंट असतो. खैरवाड आणि मारवाड बौरी गांवांत धर्मशाळांत किंवा देवळांत उतरतात. बाकी सर्व जातींचे धौरी गांवकुसाजवळ मैदानांत, पाण्यानजीकच्या बा अगर झाडींत, किंवा वस्ति नाहीं अशा एखाद्या मठांत किंवा देवळांत उतरतात. बदक बहुधा पालें ठोकून रहातात; आणि दिल्लीवाल बरोबर बायकामुलें असल्यास पावसाळ्यांत पार्ले देतात. लोकसंख्याः- या जातीची मुंबई इलाख्यांत वस्ति किती आहे, याजबद्दल माहिती मिळून येत नाहीं. स्वरूपः - खानदेशचे बंजारी किंवा पंचमहालचे लभाण यांप्रमाणें ते दिसतात. त्यांची उंची सरासरी, शरीर रासवट व इंद्रियें तीक्ष्ण अस- तात. ते मजबूद, बांधेसूद, फिकट किंवा काळसर, चपळ व श्रमसहिष्णु असतात. गुन्हा करण्याचे कामी त्यांना बायकांची मदत नसते. परंतु त्या चोरीच्या मालाची व्यवस्था लावण्याचे कामांत व वकील देण्याचे कामांत मदत करतात. बौन्यांच्या धोतराचे आंतून लंगोटी नसते. ते दहा हाती धोतर किंवा सहा हाती पंचा ( आंगोचा ) नेसतात. धोतर उजव्या मांडीकडे व पंचा डाव्या मांडीकडे अपरा असतो. ते कुडतें व मोठा फेटा घालतात. मारवाडी बौरी उजव्या पायांत कडें बाल- तात. बदक बौयांची रहाणी सर्वांत घाणेरडी आणि अव्यवस्थित असते.