पान:गुन्हेगार जाती.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुंबई इलाख्यांत येणारे इतर प्रांतांतील गुन्हेगार. बौरी किंवा बौरिये. संज्ञाः- मुंबई इलाख्यांत ज्या परप्रांतांतल्या गुन्हेगार जाती येतात त्या सर्वांत बौरी किंवा बौरिये फार चतुर व चिकाटीचे असतात. त्यांच्या पोटजाती खालीं लिहिल्याप्रमाणें आहेत:- दिल्लीवाल, मालपुरे किंवा करौली, खैरवाडे किंवा केरार, बदक, मारवाड बौरी, पंजाबी, माळवी अथवा मोघिये बौरी. त्यांच्यांत सोलंकी, कोळी, दाबी, चव्हाण, वधियेरे, दांडल, परमार, वगैरे रजपुतांच्याप्रमाणें कुळ्या आहेत. वस्तिः- दिल्लीवालांचें मूळ ठिकाण मुजफरनगर, मालपुऱ्यांचें भो- पाळ, खैरवाडांचें ग्वाल्हेर, बदकांचें भोपाळ आणि संयुक्तप्रांत, आणि मारवाड्यांचें मारवाड होय. गुन्ह्यांचे क्षेत्र:- बौरी सिलोनखेरीज करून चोहींकडे गुन्हे करतात. ते जगन्नाथ, त्रिंबक, द्वारका, रामेश्वर, प्रयाग, काशी, अयोध्या, ओंकार, हरिद्वार येथे जातात. परंतु मोधीये गुजराथ व खानदेश ह्यांच्याखालीं उतरत नाहींत. बौरी लोक खेड्यांत तसे शहरांतही गुन्हे करतात. त्यांच्या टोळींत दहांपर्यंत इसम असतात. संशय येईपर्यंत मोठ्या गांवीं सर्वजण एकत्र काम करतात. मोठ्या घरफोडीकरितां ते दिवसांतून चाळीस चाळीस मैल जातात. दिल्लीवाल व मारवाडांच्या टोळीच्या नायकाला " कमाऊ, मालपुवाला ८ काडु, " बद-