Jump to content

पान:गुन्हेगार जाती.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ गुन्हेगार जाती. वेडेवाकडे मारे घरांवर बसले म्हणजे वडारांचें काम समजावें. भिंतीला जलद भोंकें पाडण्यांत वडार फार तरबेज असतात. जर एका घरीं कांहीं मिळालें नाहीं तर ते दुसरें घर फोडतात. बड्डर बहुधा गुन्हा कबूल करीत नाहींत, आणि एकमेकांला गुंतवीत नाहींत. फोडलेल्या घरांतील इसमांनी घुशीसारखा भिंत उकरण्याचा आवाज ऐकला असेल, आणि जवळपास वडाऱ्यांचा तळ असेल तर तेथें अवश्य तपास करावा. गुन्ह्यांची हत्यारें:- सोडगे, गोफण, धोंडे, सुऱ्या, कनगट्टी, पहार हीं त्यांची गुन्ह्यांची हत्यारें होत. चोरीच्या मालाची निर्गतिः- चोरीचा माल ते टोळीतील विश्वासू इसमाजवळ देतात, तो तो माल तळाजवळच्या शेतांत अगर जंगलांत पुरतो. नंतर तो दोस्तीतले सोनार, कलाल, सावकार यांना विकतात. ते जवाहीर कधीं वांटून घेत नाहींत, त्याचे पैसे करतात. त्यांत पेड- डूचा वांटा मोठा असतो. बढाऱ्यांजवळ चोरीचा माल बहुधा मिळत नाहीं.