पान:गुन्हेगार जाती.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वड्डर. १११ घरें उघडी आहेत तोंच टोळी गांवांत घुसते व घरावर चालून जाऊन आंतील माणसांस ठोकून लुटीसह पसार होते. ते बायकांना मारहाण करीत नाहींत आणि त्यांचे मंगळसूत्र, जोडवीं नेत नाहींत. माल ताबड- तोब काढून दिला नाहीं किंवा जवाहिराची जागा दाखविली नाहीं किंवा कोणी आडवें आलें, तर ते बेसुमार मारहाण, वेळेवर खूनही करतात. गांवाबाहेर “पेडहू" सर्वांची हजिरी घेतो आणि सर्वजण संकेत- स्थानीं येतात. जें कांहीं जवळ असेल तें प्रत्येकजण काढून देतो. “ पेड्डड्डू ” सर्वोचा झाडा घेतो. एक दोघा विश्वासू इसमांच्या तान्यांत ते चोरीचा माल देतात. पोलिसला हूल दाखविण्यासाठी आणि दुसऱ्या जातीचा संशय यावा म्हणून ते लमाणांच्यासारखे पानसुपारीचे बटवे गुन्ह्याच्या ठिकाणाजवळ टाकतात. ते एका फेरीत एकच घर मारतात. रस्त्यावर दरोडा :- लुटण्याजोग्या गाड्या किंवा प्रवाशी शोधून काढण्यासाठीं गांवानजिकच्या हमरस्त्यावर, धर्मशाळांत किंवा उताराच्या जागीं ते हेर बसवितात. बाकीची टोळी नाल्यांत, पुलाखाली किंवा खडकाच्या आड दडून रहाते. बातमी मिळाल्यावर शिकार आली की टोळी बाहेर पडते. ते बैल सोडतात, गाड्या उलथवितात, वाटसरांना ठोकतात, त्यांच्याजवळचें जडजवाहीर हिसकून घेतात, पेट्या फोड़न त्यांतला माल काढून घेतात आणि आडरस्त्यांनी जातात. जर फारसा ऐवज हाती लागला नाहीं तर ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन वरीलप्रमाणें वाटसरांवर हल्ला करतात, आणि माल घेऊन तळावर जातात. तळा- पासून दहा मैलांवर उजाडण्याचे सुमारास किंवा अंधार पडण्याचे सुमारास ते हमरस्त्यावर दरोडा घालतात. घरफोडी:- बगली किंवा रुमाली पद्धतीनें कृष्णपक्षी उत्तररात्रीं दोन ते पांच वडारांची टोळी घरफोडी करते. तोडीमधील चिखल ते सुरीनें अगर पहारीनें अगर कनगट्टीनें ( अठरा इंच लांब व दीड इंच व्यासाचा पुढें चपटा होत गेलेला लोखंडी बत्ता ) काढतात. पहारीचे