पान:गुन्हेगार जाती.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० गुन्हेगार जाती. पण ते कधीं कधीं घरें फोडतात, व मेंढया चोरतात. घट्टी वड्डर दरोडा, जबरीची चोरी, रस्तालूट, घरफोडी, मेंढया चोरणें वगैरे गुन्हे करतात. यात्रांत किंवा बाजारांत त्यांची बायकापोरें उचलेगिरी करतात. घरा- बाहेर निजलेल्या इसमांच्या अंगावरचे दागिने या जातीचे पुरुष रात्रीं काढून घेतात. वर गुन्ह्यासाठीं दुसऱ्या जातीला जाऊन मिळतात आणि दुसऱ्या जातीचे लोकही आपल्यांत घेतात. गुन्ह्यांची पद्धतिः - घरावर दरोडा. जातीं लावण्याच्या मिषानें घरोघर जाणाऱ्या वडारणीमार्फत अगर भिकेसाठीं म्हणून हिंडणाऱ्या आपल्या मुलांमार्फत किंवा आपल्या दोस्तींतल्या गांवच्या बदमाषांमार्फत घट्टी वडा बातमी काढतात. त्यांच्या बायकांबरोबर मोठीं मुलें किंवा म्हातारे अस- तात. हे पुढें टोळींतल्या घरफोड्यांना घरे दाखविण्याच्या कामी उप- योगी पडतात. अशा प्रकारें मिळालेली माहिती अपुरी वाटल्यास टोळीतील एखादा इसम गाढवावर बसून येतो आणि चुकलेलें गाढव शोधण्याच्या मिषाने घराची जागा वगैरे पाहून घेतो. नंतर ते लांबच्या गांवाला तळ नेतात. टोळींत दहा ते पंधरा इसम असतात व ते एका किंवा अधिक तांड्यांतून (गुंपु ) भरतात. सब टोळी जमून गुन्ह्याचा बेत व टोळीनें कोठें केव्हां जमावयाचें वगैरे मुक्रर करते. संकेत- स्थानीं जमण्यासाठी दोन दोन, तीन तीन इसम रात्रीं निरनिराळ्या मार्गांनीं प्रवास करतात, आणि दिवसां कोठें तरी लपून राहतात. तेथें जमल्यावर “ पेड्डड्डू ” ज्याचें त्याला काम नेमून देतो. कांहींनी दगड फेंकणें, कांहींनी वाटा रोखणें आणि अनुभवशीर व धीट इसमांनी आंत घुसून घर लुटणें, याप्रमाणे कामाची वांटणी असते. ते संकेतस्थानीं फाजील कपडा वगैरे काढून ठेवितात, तोंडाला राख किंवा चुना फांस- तात, धोतराचे ओंचे खोंवतात, कमरेला काचा आंवळतात, कांबळे किंवा पासोडी खांद्यावरून कमरेला बांधतात व त्यांत दगड ठेवितात, आणि बरोबर लाठ्या, गोफण, धोंडे व एक दोन मशाली घेतात. रात्रीं