________________
वड्डर. १०७. चोरीच्या मालाची निर्गतिः- चोरीचा माल ते दोन तीन महिने शेतांत पुरून ठेवितात. नंतर तो पाटीदार, गिराशिये, वाणी, रजपूत, पाटील, सोनार व अलीकडे काठेवाडी मेमन लोक यांना विकतात. हे मेमन लोक अत्तर, कापड, मोतीं, जवाहीर, विकतात; आणि त्यांच्या टीनच्या पेट्या चोरीचा माल लपविण्याला सोईस्कर असतात. गुन्ह्यांत पुष्कळ माल मिळाला तर तो बायकांजवळ देऊन रेल्वेने पाठविण्यांत येतो. हे लोक गुह्यांगांतही माल लपवितात. सबब बायकांपुरुषांचा झाडा नीट घ्यावा. बायकांचे घागऱ्यांना चोरखिसे असतात, तरी ते व पुरुषांचे तंबुरे किंवा एकतारीही तपाशीत जावी. तसेंच त्यांच्या तळाची जागा नीट नांगरून काढावी. चोरी चांगली साधली म्हणजे वावरी लोक खाण्यापिण्याची चंगळ उडवून देतात. अशा मेजवानीला ते “भुव्याला "- ही बोलावितात. वड्डर. संज्ञाः - वडर लोक तेलंगी आहेत. त्यांच्या खाली लिहिलेल्या पोट- जाती आहेत:- मण्ण किंवा माती; भंडी किंवा गाडी; पाथरट, जंती, कल्ल . किंवा दगडी (मद्रासेकडे यांना इसुराये ( = जातें) वड्डर म्हणतात. ) घट्टी किंवा डोंग ( चोर ) अगर टक्क (ठक ). वस्तिः- ते महाराष्ट्र, कर्नाटक आणि कोंकणभर पसरले आहेत. गुन्ह्यांचें क्षेत्र:- वडारी फिरस्ते असून, काम मिळेल तेथें पालांत रहातात. कांहीं भंडी व मण्ण वडार गांवांत स्थाईक झाले आहेत. भंडी आणि घट्टी वड्डर हे विशेष गुन्हेगार आहेत. ते तळापासून