पान:गुन्हेगार जाती.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ गुन्हेगार जाती. तीस मैल जाऊन दरोडा मारतात. ते बहुधा तळापासून पंधरा मैलांपर्यंत घरफोड्या करतात. पाटील अनुकूल असला व हेरून ठेविलेलें घर एक दोन दिवसांचे मजलेवर असले तर ते शंभर मैलांवरही जाऊन गुन्हा करतात. ते रहातात त्या तालुक्याचे हद्दीबाहेर गुन्हा करतात. लोकसंख्याः- वर सुमारें चौऱ्याहत्तर हजार आहे. बायका लुगडें नेसतात आणि स्वरूप :- ही जात फिरस्ती आहे. त्यांचें शरीर फक्कड व वर्ण काळा असतो. ते मेहनती, श्रमसहिष्णु, घाणेरडे, उडाऊ, दारूबाज असतात. ते डुकरें खातात, गाई खात नाहींत. त्यांना घुशी फार आवडतात. ते गांजा, तंबाखू ओढतात. त्यांच्यांत कपड्याची वानवाच असते. पुरुषांचा पोषाख 'धोतर अगर चोळणा, आंगी अगर पेहरण, रुमाल, हचडा, कांबळें अगर उपरणें हा होय. ते जोडे घालीत नाहींत. वरचा पदर डोकें व छाती ह्यांवरून घेतात. त्या चोळी घालीत नाहींत, आणि उजव्या हातांत बांगडी घालीत नाहींत. त्या काशाच्या किंवा पितळेच्या बांगड्या घालतात. भंडी वडार गांवोगांव फिरतात व पडदे सोडलेल्या गवती पालांतून गांवाबाहेर राहतात. त्यांच्याबरोबर बायका, पोरें, आणि लहान चाकाचे गाडे असतात. कल्ल वडार गांवा- जवळ गोदड्यांच्या, क्वचित् गवताच्या पालांत उतरतात. त्यांच्याबरोबर त्यांची बायकापोरें, गाढवें असतात. घट्टी वडार गांवापासून मैल दोन मैलांवर जंगलांत चटायांच्या पालांत उतरतात. त्यांच्याबरोबर त्यांची बायकापोरें, गाढवें, बकरीं असतात. मण्ण वडार गांवोगांव कायमची वस्ति करून राहिले आहेत. कर्नाटकांत वडारांच्या तळाला " गुंपु ' म्हणतात, आणि नाईकाला “ पेड्डड्डू ” ह्मणतात. तो पंचामार्फत जातीचीं भांडणें मिटवितो. 27 भाषाः- वडार आपापसांत तेलगू भाषा बोलतात. तसेंच ते राह- तात त्या जिल्ह्याची कानडी किंवा मराठी भाषाही बोलतात.