पान:गुन्हेगार जाती.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ गुन्हेगार जाती. . एकटेच दिसलें तर वाघरी व वाघरिणी त्याला फळें किंवा खाऊ देऊन किंवा झुंबराच्या कांचा दाखवून एकांत ठिकाणीं घुलवून नेतात, आणि त्याचे दागिने काढून घेतात. भीक मागतांना ते खुशाल घरांत शिरतात आणि हाती पडेल तें चोरतात. बावरिणी दोघी किंवा अधिक मिळून चोरी करतात. रेल्वेत चोरी करण्याची त्यांची रीत खालीं लिहिल्या- प्रमाणे आहे:- दोबी किंवा तिघी आपण वरिष्ठ जातीचे आहोंत असें सांगून रात्री बायकांचे डब्यांत बसतात. जागा नाहीं ह्मणून किंवा मूल रडतें ( चिमटा घेऊन त्याला रडवावयाला लावितात) तें पाजावयाला ह्मणून बांकाखाली जाऊन एक निजते, तेथें भिंगानें किंवा चाकूनें एखादें पाकीट फोडते, किंवा खिळ्यानें अगर किल्लीनें ट्रंक उघडते, आणि त्यांतील माल बांकावर बसलेल्या आपल्या साथीदारणीला देते. ती तो टांगांमध्ये किंवा घागऱ्याच्या चोरखिशामध्ये लपवून ठेविते. नंतर पुढील स्टेशनावर त्या सर्वजणी उतरून पसार होतात. कांहीं देखण्या वाघरिणी ज्या स्टेशनावरून आपल्याला नेहमीं उतरावयाचें चढावयाचें असतें तेथील रेल्वेनोकरांशी वळण बांधतात. तथापि ज्या स्टेशनावर चोरी उघडकीस आली असेल, त्याच्या मागच्या स्टेशनावर नजीक लांबची तिकिटें तपासली असतां चोरीचा पत्ता लागण्याचा संभव असतो. लग्नाची अड- चण पडलेल्या पाटीदार किंवा कुणब्याशीं वाघरिणी लग्न लावून त्यांच्या- बरोबर कांहीं दिवस संसार करतात; व तो बाहेरगांवीं गेला आहे अशा समयीं दागदागिने घेऊन त्या पसार होतात, असे कित्येकदां घडून - आल्याची उदाहरणे आहेत. गुन्ह्यांची हत्यारेः - खातरिया किंवा गणेशिया, विंजनू ( पटाशी ), करीयली ढांग ( एका टोकाला लोखंडाच्या विड्या बसविलेली भरीव काठी ), सुरा, वान्सी, धारिया ( अणीदार सुरा बसविला आहे अशी काठी ), किल्ल्यांचा जुडगा, मेणबत्त्या, आगपेट्या हीं त्यांची गुन्ह्याचीं हत्यारें होत. वाघरिणीजवळ चोरीचा माल सांठवावयाला बगलेत एक लहान बटवी, एक कांचेचा तुकडा, किंवा चाकू ह्या जिनसा असतात.