पान:गुन्हेगार जाती.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाघरी. १०५ किंवा उंदराप्रमाणें आवाज काढून ते एकमेकांना खूण करतात. तळब्द वाघरी अट्टल घरफोडे असतात. बातमी काढण्यासाठी ते आपल्या जातभाईंच्या घरीं वाण्याच्या वेषानें जाऊन उतरतात. तसेंच वाणी, ब्राह्मण वगैरे परजातीचे लोकही त्यांना खबर देतात. कधीं कधीं जें घर 'फोडावयाचें तें व त्याच्या आजूबाजूची जागा ते दिवसांच पाहून ठेवि- तात. रस्त्यानें ते उगीच हिंडतांना दिसतात, पण त्यांचे डोळे गरगर फिरत असतात, इकडे पोलिसनें लक्ष यावें. आपले मित्र रहातात त्या गल्लीत आणि चांदण्या रात्रीं ते बहुधा घरफोडी करीत नाहींत. चोरीचा माल घेणाराला खरे किंवा खोटे दागिने दाखवून ते एखाद्या सोईस्कर ठिकाणीं घुलवून नेतात. तेथें त्यांच्याचपैकीं कांहींजण पोलिसच्या वेषाने येतात. पुन: दुसरे एखादे वेळीं सौदा करूं, आतां पैसे व दागिने येथें राहूं या आणि झटकन आधीं निघून जा, असें माल घेणाराचे मनांत भरवून त्याला काढून देतात किंवा खोटे दागिने त्याच्या माथी मारून घाईघाईनें त्याला तेथून लावून देतात; अथवा बोभाटा होऊं नये म्हणून आह्मी पोलिसला दागिने देतों, तुम्ही पैसे द्या, असें सांगून त्यांजकडून पैसे देववितात; अगर माल घेणारा सौदा करून परत चालला असतां त्याला रस्त्यानें लुटतात. मोठ्या शहरांत ते भोंदण्याजोगा इसम चाल- लासें पाहून कृत्रिम सोन्याचा तुकडा रस्त्यांत टाकतात. जाणारा इसम तो उचलतो. मग ते त्याला ह्मणतात की, ' वांटा टाक नाहीं तर मी पोलि- सला वर्दी देतों. ' हो ना करतां त्याचेजवळून ते दहा बारा रुपये उपट- तात. कधीं कधीं त्यांचाच एखादा इसम मध्ये पडून रक्कम ठरवितो. मुलांच्या अंगावरचे दागिने काढण्यांत वाघरिणी फार पटाईत असतात. लग्नकार्यात पंक्ति उठून बायका घरोघर जाण्याला निघणार इतक्यांत त्या त्यांच्यांत मिसळून बायकामुलांचें दागिने काढून हातोहात लांब- वितात. कधीं कधीं आपणांला ब्राह्मणी ह्मणवून त्या आयत्या वेळेला पंक्तींत येतात, आणि आपला धंदा चालवितात. रस्त्यांत लहान मूल