पान:गुन्हेगार जाती.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ गुन्हेगार जाती. गुन्ह्यांची पद्धतिः- भीक मागण्यासाठी हिंडत असतांना वाघ- यांना गुन्ह्याची खबर लागते आणि चोरी करण्याला सवड सांपडते. शहरांत भीक मागत असतांना ते मुक्याबहिऱ्याचें सोंग आणून भीक उकळतात, आणि रात्रीच्या उद्योगाकरितां घरेही हेरून ठेवितात. भाजी- पाला विकतांना त्यांच्या बायका, व लांकडें फोडण्यासाठीं कुन्हाड घेऊन हिंडत असतांना पुरुष चोरीसंबंधानें बातमी काढतात. तसेंच परगांवीं रहाणाऱ्या आपल्या जातभाईशी ते दळणवळण ठेवितात, आणि त्यामुळे गुन्ह्यासंबंधी भेटी, बेत वगैरेंची त्यांना योजना करतां येते. गुन्ह्याच्या कामांत ते परजातीच्या लोकांशी मिसळत नाहींत; पण चोरीसाठीं ते तळदे आणि चुंवालिया कोळ्यांना आपल्याबरोबर घेतात. " खातरीया " ( दीड फूट लांब व एका बाजूला आंकडी आणि दुसरे बाजूला टांकीसारखें असलेले लोखंडी हत्यार ) चालविण्यांत ते फार वाकबगार असतात. खातरीयाच्या टोंकाने ते घराच्या विटा व तोडी उखळतात व आंकडीच्या योगानें पेट्यांचे व दारांचे कोयंडे उचटतात. ते पाण्याच्या नळाने घरावर चढतात, आणि घरामधील शेरी अरुंद असल्यास पाठीनें व पायांनीं चढून जातात. रात्रीच्या वेळीं पडवींत निजणाऱ्या लोकांच्या अंगावरचे दागिने ते चोरपायानें येऊन काढून नेतात. त्यांचा पाठलाग केला तर ते वान्सीचा ( कोयता बसविलेली काठी ) वार करतात. वाघरी पुरुष व स्त्रिया गुन्हा कबूल करीत नाहींत व आपल्या साथी- दारांना गुंतवीत नाहींत. घरफोडीसाठी ते बिजागऱ्यांवरून दार उचटतात, किंवा चौकटीच्या बाजूला बगलीपद्धतीनें भोंक पाडून कडी अथवा आगळ काढतात, अगर मागच्या भिंतीला माणूस न जाईल असें लहान भोंक पाडतात, किंवा खिडक्यांची चौकट काढतात. घर फोडणाऱ्या टोळींत बहुधा पांचांवर इसम नसतात; दोघे घरांत शिरतात, एखाद- . दुसरा पहारा करतो आणि बाकीचे माल लांबवितात. घरांतून लौकर निसटतां यावें ह्मणून ते दार किंवा खिडकी उघडी ठेवितात. सापाप्रमाणें