पान:गुन्हेगार जाती.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुन्हेगार जाती. गुन्ह्यांचें क्षेत्रः- यद्यपि कांहीं पोटजाती अजून फिरस्त्या राहिल्या आहेत, तथापि बंजारे बहुतेक स्थाईक झाल्यासारखेच आहेत. कोठें कोठें त्यांच्याच तांड्यांचीं गांवें झालीं आहेत. तळा (तांडा ) पासून तीस ते साठ मैलपर्यंत ते गुन्हे करतात. जनावरें उचलण्यासाठीं ते वेळेवर याही- पेक्षां लांच जातात. तळाच्या आसपास ते गुन्हे करीत नाहींत. लोकसंख्याः- या जातीची लोकसंख्या मुंबई इलाख्यांत एक लाख बंजारी व अठरा हजार लंबाणी आहे. बंजाऱ्यांचा भरणा खानदेश, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, पुणे, ठाणें ह्यांत विशेष आहे; व लमाणांचा धारवाड, विजापूर, दक्षिण भागांतील संस्थानें, पंचमहाल, बेळगांव, कानडा येथें आहे. - स्वरूपः- गांवठाणापासून दूर अशा पडीत जमिनीवर बंजाऱ्यांच्या तांड्यांची वस्ति असते. दरएक तांडयाला नाईक असतो, तो तांड्या- च्या पंचायती मिटवितो, व त्याच्यातर्फे इतरांशी बोलणें चालणें करितो. पुरुष उंच, धट्टे कट्टे, निमगोरे, बांधेसूद, कंटक आणि जबरदस्त मजल काटणारे असतात. जरा घामटपणानें राहणारे त्यांच्यांतले गरीब लोक सोडून द्या; पण एकंदरींत ही जात थेट इतर शेतकरी जातीप्रमाणें दिसते. पुरुषांचा पेहराव व तोंडवळा अंशतः घरंदाज मराठे किंवा मार- वाड रजपुताप्रमाणे दिसतो. त्यांचा नेहमींचा पोषाख झटला झणजे धोतर अगर चोळणा, अंगरखा अगर पेहरण, पांढरें किंवा रंगीत पागोटें हा होय. ते सणावाराचे दिवशीं भपकेदार पागोटें घालितात. सधन बंजारे घराबाहेर जातात तेव्हां भले मोठें तांबडें पागोटें घालून त्यावर उपरणें वेडेवांकडें गुंडाळतात. धारी सुंता करतात, पण त्यांची रहाणी व पुष्कळ नांवें हिंदूप्रमाणं असतात. बंजारणींचा बांधा व रूप चांगलें असतें. कोठें कोठें त्या बड्या धीट व बोलक्या असतात; व कोठें कोठें त्या लाजाळू व अवोल असून बाहेर मारवाडणीप्रमाणें तोंडावरून पदर घेतात. चारणांच्या बायका मोठ्या गमतीच्या दिसतात; त्यांचे ते झळक-