पान:गुन्हेगार जाती.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंजारे. ३ , फळक, लाल किंवा निळे घागरे ( लहंगे ), त्याच रंगाचीं भिंगें, मणी किंवा शिंपा बसविलेली कशिदेदार ओढणी, कडक पण पोकळ कांचोळी, हाडकांच्या, शिंगाच्या किंवा पितळेच्या कोंपरभर बांगड्या, नानाप्रका- रचीं डोकीचीं फुलें ह्यांनीं भरलेली कंबरेपर्यंत वेणी, आणि अग्रफुलें गुंफलेल्या कानशिलावर लोंबणाऱ्या बटा, रेलचेल पितळी पैंजण, कान- बाळ्या इत्यादि मोठी मजा दिसते. कोठें कोठें सौभाग्यवती बंजारणी माथ्यावर वेणीमध्ये सुमारें नऊ इंच लांबीचें शिंग अगर खुंटी घालितात व त्यावरून ओढणी घेतात. धारी जातीच्या बायका कोठें कोठें कोंप- राच्या वर बांगड्या भरीत नाहींत. मुसलमानणीप्रमाणे साडीचोळी फक्त लग्नकार्यात त्या नेसतात. धालिया जातीच्या बायका मांगिणीप्रमाणे साडीचोळी नेसतात व कांचेच्या बांगड्या भरतात. व बंजाऱ्यांत मथुरियांची जात बेगुन्हेगार, श्रेष्ठ, पण कमी भरण्याची आहे. ते खाऊन पिऊन सुखी असतात, घरांतून राहतात, जानवें अगर तुळशीची माळ घालतात, मद्यमांस खात नाहींत, आणि इतरांपेक्षां स्वच्छ राहतात. गुजरणीप्रमाणे त्यांच्या बायका साडी नेसतात, व केंसांच्या शेवटीं दोन इंच लांबीची कापडी खुंटी घालून माथ्यावर वेणी घालतात, आणि तिच्यावरून साडीचा पदर घेतात. लभाण पुरुष व बायकांचा पोषाख व राहणी मथुरियाप्रमाणें असते. बंजारे देवभोळे व फार चीडखारे असतात. ते नेहमीं आपसांत भांडतात, व कधीं कधीं रक्तपातही कर- तात. परंतु हळूहळू ते निवळत चालले आहेत. मथुरीये व लमाण सोडून बाकीच्या जातींच्या बंजाऱ्यांना मद्यमांस फार आवडतें. आपले भाले व नांवाजलेले कुत्रे घेऊन ते जंगलांत शिकार करतात. त्यांच्यांतल्या सघन लोकांचीं घरें मजबूत असतात; पण बहुतेकांचीं ताडपानांचीं किंवा गव- ताचीं छपरें असतात. प्रवासांत ते पालांतून राहतात. बंजारी कुत्र्यांची. जात फार प्रसिद्ध आहे. ते घरींदारी तांड्यांची राखण करितात.