पान:गुन्हेगार जाती.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुन्हेगार जाती -- मुंबई इलाखा. बंजारे. संज्ञा:- ह्यांना स्थानपरत्वें बंजारी, ब्रिंजारी, लमाण, लंबाणी व लंबाडी ह्मणतात. यांच्यांत पोटजाती पुष्कळ आहेत. त्यांत मथुरीये, लभाण, चारण ( रजपुत बंजारे ) धारी ( यांना कर्नाटकांत तंबुरेरु ह्मणतात ) या चार मुख्य होत. धारी मुसलमान आहेत, व ते ह्या जातीचे भाट आहेत. बंजारा मांगांना धाळीये ह्मणतात. हिंदु बंजा- ज्यांच्या पोटजातींत सोनार, खवाशी अथवा न्हावी, पुजारी वगैरे आढ- ळून येतात. अहमदनगर, नाशिक, पुणे, खानदेश ह्यांमध्ये खेड्या- पाड्यांतून वंजारी जातीची वस्ति आहे. ही जात बंजाऱ्याहून वेगळी आहे. त्यांच्या रीतीभाती, पेहराव, भाषा, दक्षिणी मराठ्याप्रमाणे असून ते गुन्हे करीत नाहींत. गुजरायेंत थोडेसे गोवरीया अथवा गोवलीया आणि लमाण बंजारे दृष्टीस पडतात. त्यांची भाषा, पेहराव व तोंडवळा दक्षिणी व कानडी बंजायाहून किंचित् भिन्न आहे. हे लोक शेतकरी असून बिनपरवाना अफू आणण्याखेरीज दुसऱ्या कोणत्याही गुन्ह्यांत पडत नाहींत. - www Spowe वस्तिः - मुंबई इलाखा, निजामशाही, ह्रैसूर, मद्रास, मध्यप्रांत व वहऱ्हाड येथें हे लोक सांपडतात.