पान:गुन्हेगार जाती.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० गुन्हेगार जाती. गुन्ह्यांचें क्षेत्रः - वाघरी गुन्ह्यासाठीं मुंबई इलाखा, सिंध, मध्यप्रांत, मद्रास, बंगाल, दिल्ली वगैरेपर्यंत फिरतात. पण ते विशेषतः गुजराथ, काठेवाड, मुंबई शहर येथें गुन्हे करतात. बहुतेकजण घरेंदारें करून राहिले आहेत. पण कित्येक बायकापोरें, देव्हारा, पालें घेऊन भटकतात. कांहींजण प्रवासामध्ये देवळांत, धर्मशाळेत वेळ पडल्यास गांवांतल्या घरांतही राहतात. ते दिवाळीनंतर घराबाहेर पडतात. हंगामांत ते गांवो- गांव फिरतात, आणि पावसाळाभर एखाद्या गांवीं मुक्काम करतात. तळब्दे वाघरी अमुकच वेळेला घर सोडतात असें नाहीं. त्यांच्या टोळींत चार पांच सडे इसम असतात. ते गांवाबाहेर मुक्काम करीत नाहींत. रेल्वेनें प्रवास करतांना ते आपल्या गांवापासून कांहीं अंतरावरच्या स्टेशनावर बसतात, व निराळ्या स्टेशनावर उतरतात, आणि तेथपर्यंत पायीं चालतात. लोकसंख्याः- वाघऱ्यांची लोकसंख्या सुमारें साठ हजार आहे. 66 " स्वरूपः- त्यांची जात कोळी आणि धेड यांच्या दरम्यान आहे. त्यांची वस्ति गांवाबाहेर राहते. त्यांच्या गुरूंना भुवे ” ह्मणतात. त्यांचा पोषाख हलक्या जातीच्या गुजराथ्याप्रमाणें असतो. पुरुषांचा पोषाख धोतर अगर चोळणा, अर्ध्यामुर्ध्या डोक्यास गुंडाळलेलें एक फडकें व पेहरण हा असतो. तळब्दा आणि चुनारिया वाघरी बाकींच्यापेक्षां जरा स्वच्छ राहतात, आणि पांघरूण चिरगूट जास्त वापरतात. वाघ- रिणी घागरा किंवा साडी, कांचोळी व ओढणी नेसतात. त्या बुगड्या आणि रुंद लांकडाच्या किंवा कांचेच्या बांगड्या घालतात. तळब्दिणी- शिवाय बाकी सर्व जातींच्या वाघरिणी पायांत रुप्याचे तोडे घालीत नाहींत. वाघरी ठेंगणे, फाटक्या अंगाचे, चपळ, बांधेसूद, टणक, रंगदार व श्रमसहिष्णु असतात. त्यांचा वर्ण काळा व शरीर रासवट असतें. त्यां- मध्यें सुरेख स्त्रीपुरुष क्वचित आढळतात. ते घामट आणि गचाळ राहतात, आणि त्यांत भिकारचाळे पूर्ण भरलेले असतात. त्यांचे पांच ते दहा