पान:गुन्हेगार जाती.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाघरी.' ९९ गुन्ह्यांची हत्यारें:- मशाली, मिळाल्या तर तलवारी, बंदुका, काठ्या, गोफण, धोंडे, पहारी, कुन्हाडी आणि आपटबार, ही रामोशांची गुन्हे करण्याची सामग्री होय. चोरीच्या मालाची निर्गतिः- चोरीचा माल रामोशी आपल्या. शेतांत पुरीत नाहींत. तो ते जंगलांत, दऱ्याखोऱ्यांत पुरतात; आणि कांहीं दिवसांनी बाहेर काढून मारवाडी, गुजर, सोनार, पाटील, कुट- कर्णी, यांच्यामार्फत विकतात. चोरीच्या मालाची ते एकदम वांटणी करीत नाहींत. तो बहुधा नाइकाच्या दिमतीला असतो. त्याचे पैसे केल्यावर ते वांटणी करतात. नायकाचा वांटा जरा मोठा असतो. ते दुसऱ्या जातीच्या अडत्यामार्फत चोरीचा माल विकतात, व आठ ते बारा रुपये तोळ्याप्रमाणें सोनें विकतात. वाघरी. संज्ञाः- मारवाडी वाघरी ऊर्फ गुजराथ बौरी किंवा टाकणकर पारधी ह्या दोन्हीही जाती गुजराथ वाघऱ्याहून भिन्न आहेत. वाघ यांच्या सु- प्रसिद्ध पोटजाती खालीं लिहिल्याप्रमाणे आहेत- चुनारिया, दातनिया ( ऊर्फ तंबुरिया, आणि गोदरिया ), वेडू अथवा वेडवा, चुंवालिया, कंकोडिया ( यांत चिकडी यांचा समावेश होतो ), पटनी अथवा पटन- वाडिया, तळब्दा, धांडरिया अथवा धांडया. वस्तिः-ह्यांचें वसतिस्थान गुजराथ असून त्यांचा भरणा अहमदा- बाद आणि खेडा या जिल्ह्यांत आहे. ते काठेवाड, सुरत, पंचमहाल, मुंबईशहर येथेंही पांगलेले आहेत.