पान:गुन्हेगार जाती.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ गुन्हेगार जाती. टाकले असतात त्या ठिकाणी येतात, तेथे टोळीवाल्यांचा झाडा घेऊन माल एकत्र करतात आणि त्याची वांटणी करतात. नंतर वाटा फुटतात तेथून ते एकएक वेगवेगळे घरांकडे जातात. धारकरी ( लढवय्ये) आणि पायसुर ( जलद पळणारे ) यांना मोठा बांटा मिळतो. रस्तालुटीसाठी टोळीचे लहान लहान भाग करून ते माऱ्याच्या जागेजवळ दडून बस- तात व गाडी किंवा मुशाफर आला म्हणजे त्यावर तुटून पडतात, माण- सांना चोपतात, आणि त्यांचें जडजवाहीर लुटतात. ते मागची किंवा बाजूची भिंत फोडून रुमाली पद्धतीनें घरफोडी करतात. रामोशी लाठी किंवा मोठी काठी बारीक बाजूनें धरतात आणि मांग जाड बाजुनें धरतात असे म्हणतात. कोणाच्या दृष्टीस पडूं नये म्हणून ते रात्री जंगलां- तून प्रवास करतात, आणि दिवसां दरीत, नाल्यांत दडून राहतात. एकदां पुरंदरच्या बारा रामोशांची टोळी आगगाडीनें २० मैल जाऊन मधल्याच स्टेशनावर उतरून १०।१२ मैल सडकेने गेली, आणि पूर्वी पाहून ठेविलेल्या घरावर दरोडा मारून परत सडकेने आली. रामोशी बातमी मिळवून ज्या खोलींत घुसतात तिच्या पलीकडे सर्व घर धुंडाळीत बसत - नाहींत. ते मेंढ्यांची चोरी मध्यरात्री एकएकटे किंवा टोळीने करतात. एक इसम मेंढवाड्याजवळ निवाऱ्याच्या बाजूने झपाट्याने जातो व बसतो; आणि बाकीचे शें दीडशे कदमांवर राहतात. नंतर तो कडेचें मेंढरू उचलतो आणि उजवा हात त्याच्या मागच्या पायांमध्यें व डावा हात पुढच्या पायांमध्ये घालून त्याची मान बगलेत अशी दाबून धरतो कीं त्या मेंढराला व्यां म्हणून करतां येत नाहीं. अशा रीतीनें आरडा- ओरड होईपर्यंत मंढरे नेऊन तीं आपल्या साथीदारांच्या हवाली करतो. नंतर टोळी संकेतस्थानीं जाते व तेथें तीं जनावरें मारतात आणि त्यांचें मांस वांटून घेतात. असें सांगतात कीं, चोरलेल्या शेळ्यामेंढयांनी ओरडूं नये म्हणून रामोशी, कैकाडी आणि कातोडी हे त्यांचे जिभेला मोठा कांटा टोचतात.