पान:गुन्हेगार जाती.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामोशी. ९७ असतात तेही आपल्या जातभाईंना माहिती पुरवितात. गुन्हा करण्या- साठीं ते तीन ते पंधरा इसमांची टोळी करतात. तिच्यांत एकाच गांवचे लोक असतात असें नाहीं. तिच्यावर नाईक असतो. तो कोणीं काय करावयाचें वगैरे ठरवितो. मांग वगैरे परजातीचे लोक ते आपल्या टोळींत कचित् घेतात. मांग नाइकाचे टोळींत रामोशी जात नाहींत. गुन्ह्याच्या ठिकाणापासून एकदोन मैलांवर, व गुन्हा करून परत जावयाचें तिजहून भिन्न दिशेला, एखाद्या सोइस्कर ठिकाणीं ते थांब- तात, आणि फाजील कपडा वगैरे तेथे काढून ठेवितात. गुन्ह्याचे ठिकाण जवळ आलें म्हणजे ते मशाली पेटवितात, आणि आपटबार काढतात. त्यासरसे गांवकरी आपल्या घराच्या खिडक्या, दरवाजे बंद करितात. कांहीजण घराच्या वाटा रोखून धरतात आणि एकसारखी चहूंकडे गोफण चालवितात. कांहींजण कुन्हाडीने दारें फोडून आंत घुसतात, आणि मालकाला माल काढावयाला सांगतात. तो त्यानें लवकर काढून यावा ह्मणून ते त्याला मशालीनें पोळवितात, कुन्हाडीनें मान छाटण्याची भीति घालतात, आणि सर्वांच्या आईमाई उद्धरतात. ते बायकांच्या अंगावरचे दागिने चांचपतात आणि वेळेला ओरबाडून घेतात, पण सुवासिनी बायकांचें मंगळसूत्र काढून घेत नाहींत. घरांतल्या माणसांनीं मागणीबरोबर दागिने दिले तर ते कोणाला इजा करीत नाहींत. ते बायकांशी अदबीनें वागतात, पण जर कोणी आडवें झालें तर बिलकुल दया करीत नाहींत. तथापि ते जरूरी- पेक्षां जास्त इजा करीत नाहींत, आणि खांद्याच्यावर वार करीत नाहींत. ' पुकारा कराल तर मराल' असें ते जातांना घरधन्याला बजावि- तात, आणि दाराला कधीं कधीं कडी लावून मिळालें तें घेऊन चालते होतात. घरांत घुसलेले इसम बाहेर पडेपर्यंत बाहेरचे लोक आजूबाजूस रस्त्यांवर आणि घरांवर धोंडे फेंकीत राहतात. त्यामुळे जिकडे तिकडे दगडांचे ढीग पडतात. गुन्हा आटोपल्यावर ते झपाट्याने कपडे वगैरे ७