पान:गुन्हेगार जाती.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६ गुन्हेगार जाती. गुडस माचल्याची का पारण्याची... कुणव्याचें घर आहे कां ब्राह्मणाचें ! गोंन्ये तरी यरवाड मात इसमाडु नको... ठार मारलें तरी सांगूं नको. जातवाड तळ गुडसात खोबले अन यरवाड इसमड... चांगलें पागोटें घरांत ठेव, आणि वाईट घे. फदवाडच्या गुडसामधी झीमक खोगडला पटीलरे पटील... पाटलाच्या घरांत शिपाई बसला आहे. हुशार रहा. पकडील. का बोयलीस, यारवाड का जातवाड... तुम्ही खरे रामोशी आहां अगर नांवाचे ? उपजीविकेची दर्शनीं साधने:- पुष्कळ रामोशी जागलकीवर आहेत, व कांहीं थोडे पोलिसांत आहेत. ते जमीन कसतात, राखण, शेतकाम, घरकाम पत्करतात, गाड्या हांकतात व गिरण्यांत वगैरे हमाली करतात. वेषांतर:- टोळी करून दरोडा किंवा जबरीची चोरी करण्याचे वेळीं ते धाटे बांधतात, डोक्यावरून कांबळें घेऊन तें कमरेला बांधतात, आणि तोंडाला राख किंवा रंगाची पूड फांसतात. दूरवर प्रवासास गेले ह्मणजे ते आपणांला मराठी किंवा कुणबी ह्मणवितात. गुन्हे: - ते दरोडा, जबरीची चोरी करतात. रात्रीं जे मुशाफर किंवा गाड्या त्यांच्या गांवीं मुक्कामाला उतरतात त्यांजपासून ते दस्तुरी घेतात. ती न देणारांची रात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहांटेस वाट चालत अस- तांना चोरी झालीच समजा. भक्कम राखण नसेल किंवा राखणावर रामोशी नसेल, तर ते आपल्या शिवारांतील उभ्या पिकांची चोरी करतात. गुन्ह्यांची पद्धतिः- मोठे गुन्हे ते अंधाऱ्या रात्री करतात. दरोड्या- सारखा गुन्हा करण्यापूर्वी रामोशी लोक गुन्ह्याचे ठिकाणची, माणसांची, घराची, मान्याच्या जाग्याची, अडथळ्याची वगैरे सर्व माहिती का- ळजीपूर्वक मिळवून तिचें मनन करतात. पैसे मागण्याच्या मिषानें त्यांच्या बायका घरें हुडकून पुरुषांना बातमी देतात. तसेंच असली बातमी गांवच्या बदमाष लोकांकडूनही मिळते. शिवाय दर गांवाला रामोशी