पान:गुन्हेगार जाती.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ गुन्हेगार जाती. घाईवर येतात म्हणून त्यांचा झाडा घेतांना पोलिसांनी पुष्कळ लोक घेऊन जावें आणि तळाची जागा नांगरून काढावी. रामोशी. संज्ञा :- रामोशांच्या दोन पोटजाती आहेत:- पुरंदर किंवा भंडा रामोशी आणि होल्गे रामोशी. दोघांचा रोटीव्यवहार होत नाहीं. वस्तिः- त्यांचें घर महाराष्ट्र आणि माहेरघर पुर्णे व सातारा प्रांत होय. हे जिल्हे, व त्यांतील संस्थानें ह्यांत अटोकाट छातीचे रामोशी दृष्टीस पडतात. कांहींजण मुंबईत हमाल, गाडीवाले, गिरण्यांत व गोद्यांत मजूर आहेत. गुन्ह्यांचे क्षेत्र:- रामोशी महाराष्ट्रांत आपल्या गांवापासून सरासरी तीस चाळीस मैलांवर गुन्हे करतात. ते आपल्या गांवच्या आसपास किंवा तालुक्यांत मोठे गुन्हे करीत नाहींत. बंडखोर रामोशी पकडा- वयाला फार कठिण पडतें. तरीपण तो घरापासून पन्नास मैलांच्या आंत- बाहेर असतो, व मधून मधून चोरून घरी येतो. लोकसंख्या:- त्यांची लोकसंख्या सुमारें साडेसाठ हजार आहे. स्वरूपः - ते सरासरी पुऱ्या उंचीचे, बांधेसूद, पिळदार, सोशिक असतात. त्यांचा रंग काळा, शरीर रासवट पण चांगलें, आणि बुद्धि मंद असते. ते आळशी, घाणेरडे व शिकारीचे शोकी असतात. गोमांस सोडून ते सर्व प्रकारचें मांस खातात. ते दारूबाज असतात, आणि तंबाखू खातात व ओढतात. त्यांचा पोषाख हलक्या जातींच्या हिंदूप्रमाण असतो. गुन्ह्याचे वेळीं रामोशिणी पुरुषाबरोबर जात नाहींत. ते बडे जाति- बंद असतात, गुन्हा कबूल करीत नाहींत व साथीदारांचीं नांवें सांगत