पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ गोतारहरूय अथवा कर्मयोग करणें, इच्छिणें, निश्चय करणें, गप्प बसणें, इ. इ.-त्या सर्वाचा कर्म’ या शब्दात भगवद्गीतेंत समावेश झालेला आहे; मग ती कर्म कायिक असीत, वाचिक असीत वा मानसिक असोत (गीता५.८,९). किबहुना देहाचे जिवंत रहाणे आणि मरणें हीं सुद्धां कर्मेच आहेत. आणि प्रसंगानुसार ‘ जगणें किवा मरणें’ या दोन कमपैिकी कोणतें पत्करावें याचाहि विचार करण्याची जरूर पडत्ये. हा विचार उपस्थित झाला म्हणजे कर्म या शब्दाचाच ‘कर्तव्यकर्म’ किवा ‘विहित कर्म'असाहि अर्थ होत असती (गी.४.१६.). मनुष्याच्या कर्माबद्दलचा हा विचार झाला. याच्याहि पलीकडे जाऊन सर्व चरांचर सृष्टीच्या-ह्मणजे अचेतन वस्तूच्याहि-व्यापारास ‘कर्म’ हाच शब्द लावीत असतात. पण त्याचा विचार पुढे कर्मविपाकप्रक्रियेंत करण्यांत येइल. कर्मापेक्षांहि अधिक भानगडीचा शब्द ह्मटला ह्मणजे ' येोग’ हा होय. या शब्दाचा हल्लीचा रूढार्थ “ प्राणायामादिक साधनांना चित्तवृत्तचिा किंवा इंद्रियांचा निरोध करणें” अथवा “पातंजलसूत्रोक्त समाधि किवा ध्यानयोग” असा असून, याअर्थी उपनिषदांतूनहि या शब्दाचा प्रयोग केलेला आहे (कठ.६.११). परंतु हा संकुचित अर्थ भगवद्गीतेंत सामान्यतः विवक्षित नाही हे प्रथम लक्षांत ठेविले पाहिजे. ‘येोग’ हा शब्द 'युज्' म्हणजे जोडणें या धातूपासून निघाला असून त्याचा धात्वर्थ ‘जोड जुळणी, मिळवणी संगति एकत्रावस्थिति’ असा आहे: व पुढे तशी स्थिति प्राप्त होण्याचा ‘उपाय,साधन, युक्ति किवा इलाज म्हणजे कर्म’ असाहि अर्थ झाला असून, “ येोगः संहननोपायध्यानसंगतियुक्तिषु” असे अमरकोशांतहिं(३.३.२२)हें सवै अर्थ दिलेले आहेत. फलज्योतिषांत कांहीं प्रह इष्ट अगर आनिष्ट असल्यास त्या प्रहांचा * येोग ’ इष्ट अगर अनिष्ट आहे असें आपण म्हणतों; आणि 'योगक्षेम' या शब्दांत ‘येोग’ म्हणजे प्राप्त न झालेल्या वस्तु मिळविणे असा अर्थ आहे (गी. ९.२२), भारती युद्धांत द्रोणाचार्य जिकले जात नाहीत असें पाहून त्यांस जिकण्यास एकच ‘योग’ ( साधन अगर युक्ति) आहे-एकोहि येोगेाऽस्य भवद्वधाय-असें श्रीकृष्णांनी म्हटले आहे (मभा. द्रो. १८१.३१); आणि पुढे आपण जरासंधादि राजांस पूर्वी धर्मरक्षणार्थ 'येोगानेंच’ कसें मारिलें याचे वर्णन केले आहे. भीष्मांनी अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचें हरणू केल्यावर इतर राजे ‘ योग, येोग ' म्हणून त्यांचे पाठीस लागले असें उद्योगपर्वात (अ. १७२) म्हटले असून,याखेरीज इतर ठिकाणींहि भारतांत याच अर्थी ‘ योग ? या शब्दाचा प्रयोग आलेला आहे. गीतेंत येोग, योगी' किंवा योग शब्दापासून झालेले सामासिक शब्द सुमारें ऐशी वेळ आलेले आहेत. परंतु फार झाले तर चारपांच (गी. ६. १२ व २३ पहा) स्थलांखेरीज ‘पातंजल योग’ हा अर्थ कोठेहि अभिप्रेत नाहीं. ‘युक्ति,कौशल्य, साधन, उपाय,जेोड, हेच अर्थ थेोडयाफार भेदानें सर्वत्र आढळून येत असून गीता