पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मयोगशास्त्र ખપ णार्थ, अनिष्ट-ग्रह-शांति, प्रायश्चितं वगैरें. ज्यासाठीं आपण शांति किंवा प्रायश्चित्तकरतों तें निमित्त पूर्वी घडलें नसल्यास ही कर्मे करण्याची जरूर नाहीं. याखेरीज आपणास कांहीं विशिष्ट गोष्टीची इच्छा होऊन तत्प्राप्त्यथै आपण कित्येकदां शास्रास अनुसरून जें कर्म करितीं तें काम्य कर्म होय; उदाहरणार्थ, पाऊस पडण्यासाठी किवा पुत्रप्राप्त्यर्थ यज्ञ करणें. नित्य, नैमित्तिक आणि काम्य यांशिवाय कांहीं कर्मे -उ०सुरापान-शास्रानें अजबिात त्याज्य ठरविली असल्यामुळे त्यांस निषिद्ध कर्म असें म्हणतात. नित्यकर्म केोणतीं, नैमित्तिक कोणतीं, किंवा काम्य आणि निषिद्ध कोणती, हें धर्मशास्रानें ठरवून टाकिलें आहः आणि अमुक पुरुषानें केलेलें अमुक कर्म पापकारक का पुण्यप्रद, असा जर एखाद्या धर्मशास्त्र्यास प्रश्न केला, तर तेो शास्रांतील आज्ञेप्रमाणें सदर कर्म यज्ञार्थ अगर पुरुषार्थ आहे, नित्य आह का नैमित्तिक आहे, काम्य आहे का निषिद्ध आहे, इत्यादि विचार करून मग आपला निर्णय सांगेल. भगवद्गीतेची दृष्टि याहून जास्त व्यापक किंबहुना याच्या पलीकडची आहे असे म्हटलें तरी चालेल. शास्रानें एखादं कर्म निषिद्ध मानिले नसेल, किंबहुना तें विहित म्हणजे आपणास करावृयास सांगितलेल्या कर्मापैर्की हिँ एक असर्ल,—उदाहरणार्थ, प्रकृतप्रर्सर्गी क्षात्रधर्म अर्जुनास विहित होता. परंतु तेवढथानेंच तें कर्म आपण नेहमीं करावें असें होत नाहीं, किंवा केल्यास तें नेहमींच श्रेयस्कर होईल असा भरवंसाहि नाहीं, शिवाय शास्रांच्या आज्ञाहिं कित्येक प्रसंगीं परस्परविरुद्ध होतात, हें मागील प्रकरणीं दाखविलेंच आहे. अशा वेळी मनुष्यानें कोणता मार्ग स्वीकारावा हें ठरविण्यास कांहा युक्ति आहे कीं काय, आणि असल्यास कोणती, हा गितेचा प्रतिपाद्य विषय आहे. या प्रतिपादनास कर्माचे जे वर भेद सागितल त्यांजकडे विशेष लक्ष पुराविण्याचे कारण.नाही. यज्ञयागादि वैदिक किवा चार वर्णाच्या इतर कर्माबद्दल मीमांसकांनीं जे सिद्धान्त केले आहेत तं गीतेंत प्रतिपादलेल्या कर्मयोगास कितपत लागू पडतात हें दाखविण्यासाठीं मीमांसकांच्या म्हणण्याचाहि गीतेंत प्रसगानुसार विचार केलेला असून, शेवटच्या अध्यायांत यज्ञयागादि कमें ज्ञानी पुरुषानें करावीं का करूं नये या प्रश्नाचे थोडक्यांत उत्तर सांगितले आहें आहे(गी.१८.६). पणगीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय याहून जास्त व्यापक असल्यामुळे गीताप्रतिपादनांत ‘कर्म'शब्दाचा अर्थकेवळश्रौत अगर स्मार्त कमें एवढाच संकुचित न समजतां त्याहून ज्यास्त व्यापक घेतला पाहिजे. सारांश, मनुष्य जें जं कांहीं करितो-त्याचे खाणे, पिणें खेळणें, बसणें, उठणें, रहाणें, श्वासोच्छ्वास करणें, हंसणें, रडणे, वास घेणें, पहाणे, बोलणें, ऐकणें, चालणें, देणें,घेणें, निजणें, जागें रहाणें, मारणें, लढाई करणें, मनन अगर ध्यान करणें, आज्ञा किंवा निषेध करणें, दान करणें, यज्ञयाग करणे, शेती किंवा व्यापारधंदे