पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कमैयेोगशास्त्र *Ave शास्रातल्या व्यापक शब्दांपैकी हा एक शब्द आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. तथापि योग म्हणजे साधन, कौशल्य अगर युक्ति, असें सामान्यतः म्हणूनहि निर्वाह लागत नाहीं. कारण, वक्त्याच्या इच्छेप्रमाणें हें साधन संन्यासाचे, कर्माचे, चित्तनिरोधाचे, मोक्षाचे किंवा दुसरें कशाचेंहि होऊं शकेल. उदाहणार्थ, गीतेतच दोनचार ठिकाणीं भगवंतांच्या नानाविध व्यक्त सृष्टि निर्माण करण्याच्या ईश्वरी कौशल्यास किवा अद्भुत सामथ्र्यास ‘योग्य’ हा शब्द लाविला असून (गी.७.२५;९."; १०.७:११.८), याच अर्थी भगवंतांस ‘योगेश्वर' असें म्हटलं आहे (गी. १८.७५). पण गतेिंतील ‘योग’ शब्दाचा हा कांहीं मुख्यार्थ नव्हे. म्हणून ‘योग’ शब्दानें कोणत्या विशिष्ट प्रकारचे कौशल्य, साधन, युक्ति अगर उपाय गीतेंत मुख्यत्वेंकरून विवक्षित आहेहें सांगण्यासाठी“योगः कर्मसु कौशलम्” (गी.२.५०)-योग ह्मणजे कर्मे करण्याची कांही विशेष प्रकारची कुशलता, युक्ति, चतुराई अगर शैलीअशी या शब्दाची व्याख्या गोर्तेतच मुद्दाम स्पष्टपणे केलली आहे; आणि यावरील शांकर भाष्यांतहि “कर्मसु कौशलम्” या पदांचा “कर्माचे ठायीं स्वभावतः असणारें जें बंधकत्व तें नाहीसे करयाची युक्ति” असाच अर्थ केलेला आहे. सामान्यतः पाहिलें तर एकच कर्म करण्याचे अनेक ‘योग’ किंवा उपाथ’ असतात. परंतु त्यपैिकी उत्तम साधनास ‘योग’ हा शब्द विशेषेकरून लावण्यांत येत असतो. उदाहरणार्थ, द्रब्ब संपादन करावयाचे असल्यास तें चोरीनें, फसवून, भिक्षेनें, सेवा करून, कर्ज काढून, महनत करून, वगैरे अनेक साधनांनी संपादन करितां थण्थासारखें असतें; व यांपैकीं प्रत्येक साधनास ‘योग’ शब्द धात्वर्थाप्रमाणें जरी लावितां येण्यासारखा असला तरी “आपलें स्वातंत्र्य न गमावितां महनत करून पैसा मिळविणे’ या उपायासच मुख्यत्वेंकरून ‘द्रव्यप्राप्तियोग’ असें ह्मणण्याचा प्रघात आहे. “योगः कर्मसु कौशलम्”-कर्म करण्याचा एक प्रकारची विशेष युक्ति म्हणजे योग-अशी खुद्द भगवंतांनींच जर योग शब्दाची गीतेंत मुद्दाम स्वतंत्र व्याख्या केली आहे, तर वास्तविक पहातां गीतेंत या शब्दाचा मुख्य अर्थ काय याबद्दल कोणतीच शंका राहूं नये. पण भगवंतांनीं केलल्या या व्याख्येकडे लक्ष न देतां ज्याअर्थी गीतेवरील बच्याच टीकाकारांनीं या शब्दाची ओढाताण करून गीतेचा मथिताथै अनेक रीतींनीं काढिला आहे, त्याअर्थी तो गैरसमज दूर करण्यास ‘येोग’ या शब्दाची येथे आणखी थोडी फोड करणें अवश्य आहे, ‘येोग' हा शब्द प्रथमतः गीतेच्या दुसच्या अध्यायांत आला असून तेथेच त्याचा अर्थ काय हेंहि स्पष्ट सांगितले आहे. युद्ध कां केले पाहिजे याची सांख्यमार्गाप्रमाणें उपपात सांगितल्यावर आतां तुला योगाप्रमाणें उपपात सांगतों (गी. २.३९) असा भगवंतांनी आरंभ केला असून, प्रथम यज्ञयागादि काम्यकर्मातच नित्य गुंग झालेल्या लोकांची