पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

%s गीतारहस्य अथवा कर्मयेोग ८. १४-१६). राजा तर गुरुपेक्षांहिं श्रष्ट अशी एक देवताच होय (मनु. ७.८ व मभा. शां. ६८. ४०.). परंतु त्यासहि हे धर्म सुटत नाहीत, सीडील तर नाश पावतो, असें मनुस्मृतीत म्हटलें असून महाभारतांत तोच अर्थ वेन व खनीनेत्र या दोन राजांच्या कथानकांत व्यक्त केला आहे (मनु. ७. ४१ व ८.१२८; मभा. शां ५९. ९२-१०० व अश्व. ४ पहा). आहंसा, सत्य आणि अस्तेय यांबरोबर ईद्रियनिग्रहाचीहि सामान्यधर्मात गणना केली जात्ये (मनु १०. ६३) काम, क्रोध, लोभ हे मनुष्याचे शत्रु असून प्रत्येकानें त्यांचा पूर्ण जय केल्याशवाय त्याचे किंवा समाजाचेहि कल्याण व्हावयाचे नाहीं, असा उपदेश सर्व शाखें करीत असून, विदुरनीतींत व भगवद्गीतेंतहि त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत् त्रयं त्यजेत् । • काम, क्रोध आणि लोभ हीं तिन्ही नरकाचीं द्वारें असून आपला नाश करणारीं असल्यामुळे त्यांचा त्याग करावा” असे म्हटलें आहे (गीता १६. २१; मभा. उ. ३२. ७०) पण गर्तितच भगवंतांनीं ‘‘धर्मीऽविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ”– हे अर्जुन ! प्राणिमात्रामध्यें धर्माला अनुसरून जो काम तो मीच (गीता ७. ११)असें आपले स्वरूप वर्णिलें आहे. अर्थात् धर्माला विरुद्ध जेो काम तोच काय तो नरकाचें द्वार होय, त्याशिवाय दुसच्या प्रकारचा काम भगवंतांस मान्य आहे असें यावरून उघड होतें: आणि मनूनेंहि“परित्यजेदर्थकामौ यौ स्यातां धर्मवर्जितौ’-- धर्माच्या विरुद्ध असतील तेवढेच अर्थ व काम सोडून द्यावे-असें म्हटले आहे (मनु ४. १७६). सर्व प्राण्यांनी उद्यां जर काममहाराजांना आजबात रजा देऊन आमरण ब्रह्मचर्यव्रत पाळण्याचें मनांत आणलें, तर पन्नास किंवा फार झालेंतर शंभर वर्षीचे आंतच सवै सजीव सृष्टीचा लय होऊन जिकड तिकडे सामसूम होईल; आणि जी सृष्टि उत्सन्न होऊँ नये म्हणून वेळोवेळी भगवान् अवतार धारण करितात तिचा थेोड्या काळांतच उच्छेद होऊन जाईल. काम व क्रोध हे शत्रु खरे, पण केव्हां ? अनावर राहूं दिल्यास, सृष्टिक्रम चालू राहण्यास योग्य मर्यादेचे आांत त्यांची अत्यंत अवश्यकता आहे, ही गोष्ट मन्वादि शास्रकारांसहि संमत आहे (मनु ५.५६). सर्व सुधारणा म्हटली म्हणचे या प्रबळ मनोवृत्तींस येोग्य आळा घालणें ही होय; समूळ नाश करणें ही नव्हे. लोके व्यवायाामेषमद्यसेवा नित्यास्ति जन्तोर्नहि तत्र चोदना । व्यवस्थितिस्तेषु विवाह्यंहसुराग्रहैरासु निवृत्तिांश्रेष्ठा ॥ “या जगांत मैथुन, मांस व मद्य यांचे सवन कर म्हणून कोणास सांगावयास नको; तीमनुष्यास स्वभावतःच हवीं असतात. या तिहींचीहि कांहीं व्यवस्था लावावी, म्ह