पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मजिज्ञासा $\S णजे त्यांसू मर्यादा किवा आळा घालून व्यवस्थित रूप द्यावें, या हेतूने विवाह, सोमयाग व सौत्रामणी यज्ञ यांची (शास्रकारांनी) अनुक्रमें योजना (केलेली) आहे. पण त्यांतहिं निवृतं म्हणजे निष्कामाचरणच इष्ट होय, ” असें भागवतांत म्हटले आहे (भाग. ११.५. ११), ‘निवृात’ या शब्दाचा पंचम्यन्त पदाशी संबंध असतां “ अमक्यापासून निवृति म्हणजे अमुक कर्म सर्वस्वी सेोडणें” असा जरी अर्थ होत असला तरी कर्मयोगात ‘निवृत्त’ हें विशेषण कर्मीभच लाविलेलें असल्यामुळे ‘निवृत्तकमै’ म्हणजे निष्काम वृद्धीनें करावयाचे कर्म असा या पदांचा अर्थ होत असतो, हें या ठिकाणी लक्षांत ठेविलें पाहिजेः व तसे अर्थ मनुस्मृति व भागवतपुराण यांत स्पष्टपणें दिलेलेहिं आहेत (मनु १२.८९: भाग ११. १०. १ व ७.१५. ४७ पहा). क्रोधासंबंधानें बोलत असतां किरातकाव्यांत (१. ३३) भारवेि असें म्हणतो कींअमपैशुन्येन जनस्य जन्तुना न जातद्दग्द्वेन न विद्विषादरः ॥ “आपला अपमान झाल्याचाहिं ज्या पुरुपाला राग किवा चाड नाहीं त्या पुरुषाची भत्री असली काय आणि द्वेष असला काय, सारखेंच !” क्षात्र *هيد पाहिले तर-- एतावानेव पुरुषे युदमर्षीं यदक्षमी । क्षमावनिरर्मर्षश्च नैव ख्ञी न पुन: पुमान् । “ ज्या पुरुषाला ( अन्यायाचा ) राग यतो व जो (अपमान)सहन करीत नाहीं तेच पुरुष म्हणावयाचा. ज्या पुरुषाला राग किंवा चीड येत नाहीं तो आणि नपुंसक सारखेंच, ” असे विदुलेनें वर्णन केलेलं आहे (मभा.उ.१३२.३३). जगाचा व्यवहार चालण्यास नहमा क्रोध किवा तजहिं उपयोगी नाही आणि नहमीं क्षमाहिं कामाची नाही हें वर सांगितलेंच आहे. लोभासहि हाच न्याय लागू आहे; कारण संन्यासी झाला तरी त्याला मोक्ष हवाच असतो ! शैौर्य, धैर्य, दया, शील, मैत्री, समता इत्यादि सर्व सद्गुणांस त्यांच्या परस्पर अनेक ठिकाणी निरनिराळ्या कथानकांतून प्रतिपादिलें आहे.कोणताहि सद्गुण झाला तरी तो सर्वेच प्रसंगी साजतेो असॆ नाह्रीं. भर्तृह्री म्हृणतो с _. विपदि धैर्थमथाभ्युदये क्षमा सदसि वाक्पटुता युधि विक्रमः । “ संकटकालीं धैर्य, उत्कर्षीचे वेळी (म्हणजे शासन करण्याचे सामथ्र्य अंगांत असूतां) क्षमा, सभंत वक्तृत्व आणि युद्धांत शौर्य हे गुण होत” (नीति.६३).थंडाईंच्या वेळी उत्तराप्रमाणें बडबड करणारे पुरुष कांहीं कमी नसतात. पण घरांत बायकोच्या नथेतून तीर मारणारे हंबीरराव जरी पुष्कळ असले, तरी त्यांपैकीं रणभूमीवर धनुर्धर म्हणून गाजणारा एखादाच निघतों ! धैर्यादि गुण वर सांगितल्या