पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मजिज्ञासा ૪પ. आपण त्या पेोराचा पशंत गणना करणार नाही काय { “गुरुर्गरीयान् पितृतो मातृतश्रेति मे मतिः” (शां. १०८. १७)-आईवापांपेक्षांहि गुरु श्रेष्ठ-असें भीष्मांनी युधिष्ठिरास सांगितले आहे. परंतु मरुत्त राजाच्या गुरूनें लोभानें स्वार्थासाठी त्याचा त्याग केल्यावर मरुतानें e e به خی गुरोरप्यवलिप्तस्य कायकायेंमजानतः । उत्पथप्रतिपन्नस्य न्याय्यं भवति शासनम् ॥ “काय करावें व काय न करावें हें न ओळखितां आपल्याच घमेंडीते आडमार्गौत शिरणाच्या गुरूसहि शासन करणें युक्त आहे” असे उद्गार काढिले, असें महाभारतांत सांगितले आहे. महाभारतांत हा लेोक चार ठिकाणी आला आहे (मभा. आ. १४२.५२,५३: उ. १७९.२४: शां. ५७.७: १४०.४८).पैकीं पहिल्या ठिकाणचा पाठ वर दिल्याप्रमाणे असून इतर स्थला चवथ्या चरणाएवर्जा “दंडो भवति शाश्वतः” किंवा “परित्यागेो विधीयते” अशा पाठांतरें आहत. परंतु वाल्मीकिरामायणांत ज्या ठिकार्णा (रामा. २. २१.१३) हा **ाक आला आह तेथे एकच म्हणजे वर दिलेला पाठच आढळून येत असल्यामुळे आम्ही तोच या ग्रंथांत स्वीकारिला आहे. भीष्मांनी परशुरामाशा व अर्जुनाने द्रोणाशी जें युद्ध केलें तें याच तत्त्वावर असून, हिरण्यकशिपूनें नेमलेले प्रल्हादाचे गुरु त्यास जेव्हां भगवत्प्राप्तीविरुद्ध उपदेश करूं लागले तेव्हां याच तत्त्वावर प्रल्हादानें त्यांचा निषेध केला आहे. शांतिपर्वात भीष्म स्वतःच श्रीकृष्णास असे सांगतात की, गुरु पूज्य खरा, पण त्यानंहि नीतीच्या मयौदा ਾਂपुन्हजेत नाहीतर- के समयत्यागॉनों लुब्धान् गुरूनtप च कशव । निहन्ति समरे 點 क्षत्रियः स ह्नि धर्मवित् ॥ “हे केशवा ! मयीदा, नीति किंवा शिष्टाचार न पाळणाच्या, लेोभी व पापिष्ठ लेोकांस, ते गुरु असले तरी, लढाईत जेा क्षत्रिय मारते तोच धर्मज्ञ होय” (शां. ५५.१६). तसेंचतैत्तिरीयोपनिषदांतहि‘आचार्यदेवो भव'असें प्रथम सांगितल्यावर पुढे लागलीच आमचीं जा कर्म चांगली आहत तेवढ्यांचेच अनुकरण करावें, इतर सोडून द्यावीत,-**थान्यस्माकं सुचरितानि । तानि त्वयोपास्यानि । नेो इतराणि ।”-असे म्हटलें आहे (नै.१. ११. २). यावरून पितृदेव किंवा आचार्यदेव झालास तरी बाप किंवा गुरु दारू पीत होते म्हणून तूं दारू पिऊं नकोस; कारण, नीतिमर्यादांचा किवा धर्माचा अधिकार आई,बाप, गुरु वगैरे सर्वापेक्षां अधिक बलवान् असतो, असा उपनिषदांचा सिद्धान्त असल्याचे उधड होतें. “धर्म पाळा, धर्माला कोणी मारील म्हणजे झुगारून देईल तर धर्म त्याचा नाश केल्याखेरीज राहणार नाहीं,” असें जें मनूनें विधान केलें आहे त्यांतील बीजहि हेंच होय (मनु.