पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ गीतारहस्य अथवा कर्मयोग श्चितें म्हणजे निरर्थक बाऊ होय असे शुद्ध आधिभौतिकशास्त्र्याचे म्हणणें पडेल. पण ज्यांनी ही प्रायश्विनें सांगितलं अहत त्यांची, किवा ज्यांच्यासाठी ती सांगितलीं त्यांचीहि समजूत तशी नसल्यामुळे हे दोघेहि वरील सत्यापवाद गौणच मानितात असा सिद्धान्त करावा लागतो आणि हाच अर्थ यासंबंधाच्या कथानकांतूनहि प्रतिपादिला आह. उदाहरणार्थ, युधिष्ठिर “नरो वा कुंजरो वा” असें । अडचणीच्या प्रसंगी एकदांच चांचपडत बेललाः पण त्यामुळे प्रवी त्याचा रथ जमीनीस सोडून चार अंगुळे वर अंतरिक्षति चालत असे तो पुढे इतर लोकांच्या रथाप्रमाणेच जमीनीवर चालू लागला व अखेर त्यामुळेच घटकाभर तरी नरकलोकीं त्यास वास करावा लागल, अरों खुद्द महाभारतांतच सागितले आहे (द्रोण. १९१. ५७, ५८ व स्वर्गी. ३. १५) तसेंच भीष्माचा वध क्षात्रवमीप्रमाणं, पण शिखंडीला पुढे करून, केल्यामुळे अजुनास आपला मुलगा बभ्रुवाहन याच्या हातानें पुढे पराभव सहन करणें प्राप्त झाले. असे अश्वमेधपवीत वेर्णन आहे (मभा. अश्व. ८१. १०). यावरून प्रसंगविशेर्पी सांगितलेले वरील अपवाद मुख्य व प्रमाण नसून महादेवांनी पार्वतीस सांगितल्याप्रमाणे आत्महेतोः परार्थे व नर्महास्याश्रूयातथा । ये मृषा न वदन्तीह ते नराः स्वगेगामिनः । “स्वार्थीकरिता, परहितार्थ, किंवा थट्टनेहि ज पुरुष या जगा कधा देखील खेोटें बोलत नाहीत त्यांसच स्वर्गप्राप्त होत्य" (मभा. अनु. १४४.१९)-असा आमच्या, शास्त्रकारांचा अखेरचा तात्त्विक सिद्धान्त आहे हें व्यक्त होते. आपलें वचन किंवा प्रतिज्ञा पाळणे याचा सत्यांतच समावेश होतो.**हिमालय पर्वत इकडचा तिकडे चळेल किंवा अग्नि थंड पडेल, पण आपला शब्द अन्यथा होणार नाहीं,” असें श्रीकृष्ण व भाष्म यांनी म्हटलें असून (मभा. आ. १०३ व उ. ८१. ४८), भर्तृहरीनेंहि तेजस्विनः सुरूम्स्नपि संत्यजन्ति । सत्य्ंवतव्यसनिनं न पुनः प्रातश्चाभ् ॥ “तेजस्वी म्हणजे बाणेदार पुरुष आनंदानें प्रणिहि देतील, पण आपली प्रतिज्ञा मेोडणार नाहीत,”-असें सत्पुरुषांचे वर्णन केले आहे (नीतिश. ११०). तसेच “द्विः शरं नाभिसंधते रामो द्विनौभिभाषते” (सुभाषित) अशी दाशरथी रामचंद्राच्या एकपत्नीव्रताबरोबरच एकवाणी व एकवचनी व्रताचीहि ख्याति झालेली आहे; आणि हरिश्चंद्रानें स्वप्रांत दिलेलें वचन सत्य करण्यासाठी डोंबाचेहि घरीं पाणी वाहिलें अशा पुराणांतून कथा आहेत. पण उलटपक्षीं इंद्रादि देवांनीहि वृत्राबरोबर केलेले करार मोडून, किवा त्यांतच पळायला कांही तरी वाट काढून