पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मजिज्ञासा ३९ वृत्राचा वध कला असें * :ांत वर्णन असून त्याला धरूनच हिरण्यकशिपूच्या वधाची गोष्ट पुराणात वर्णिली आहे. शिवाय व्यवहारांतील कांही करारसुद्धां असे असतात को , न्यायाच्या कचरीत ते गैरकायदेशीर किंवा पाळण्यास अयोग्य मानिले जातात. अर्जुनाची अशाच एक भi"ट महाभारतांत वर्णिलf आहे. अर्जुनाची अशी प्रतिज्ञा होती कं, “तूं आपले ट्राचे गांडीवधनुष्य दुस-यास दे" असें जो कोणी मला म्हणेल त्याचा मीं ताव ठतोब शिरच्छेद करीन. नंतर कर्णाने युद्धांत युधिष्ठिराचा पराजय केल्यावर युधि राचा तोंडांतून ' तुझें गांडीव आमच्या काय उपयोगी ? तें हातचे टाकूनद !” असे अर्जुनाला उद्देशून जेव्हां निराशेचे साहजिक उद्गार निघाले, तेव्हां अर्जुन हतांत तरवार घेऊन युधिष्ठिराचा वध करण्यास तयार झाला ! परंतु श्रीकृष्ण त्या वेळी जवळ असल्यामुळे सत्यधर्म म्हणजे काय, याचे तत्त्वज्ञानदृष्टया मार्मिक विवेचन करून ' तूं मूढ आहेस, तुला सूक्ष्म धर्म अद्याप कळत नाहीं, तो वृद्धांपासून शिकला पाहिजे, ‘न वृद्धाः सेवितास्त्वया'-तूं वृद्धांचीसेवा केलेली नार्हास, तुझी प्रतिज्ञाच तुला राखावयाची असल्यास युधिष्ठिरांची निर्भत्सना कर, कारण संभावित पुरुषांनः निर्भत्सैना वधाप्रमाणेच आहे,” इत्यादि प्रकारं अर्जुनास त्यांनी बोध केला; व अविचारानें त्याच्या हातून घडणाच्या ज्येष्ठभ्रातृवधांच्या पातकापासून त्यास निवत केलें, अशी कर्णपर्वात कथा आहे” (मभा. कर्ण. ६९) श्रीकृष्णांनी या वेळी सांगितलेला सत्यानृतविवेकचपुढे शांतिपर्वातं सत्यानृताध्यायी भीष्मांनी युधिष्ठिरास उपदेशिला आहे (शां. १०९); व व्यवहारांत सर्वांनीच तो लक्षांत ठेविला पाहिजे. तथापि हे सूक्ष्म प्रसंग कसे ओळखावे हें सांगणें कृठिण आहे. कारण, भ्रातृधर्म सत्यापेक्षां या ठिकाणीं जरी श्रेष्ठ झाला तरी गीतेंतील प्रसंग याच्या उलट असून बंधुप्रेमापेक्षां क्षात्रधर्म तेथे बलवत्तर ठरावला आहे, हें वाचकांच्या सहज लक्षांत येईल. अहिंसा आणि सत्य यांबद्दल जर एवढा वाद, तर तिसँर सामान्य तत्त्व जें अस्तेय त्यासहेि हाच न्याय लागू असल्यास नवल काय ? एकानें यथान्याय मिळविलेली संपति चोरून किंवा लुटून नेण्याची जर इतरांस मोकळीक मिळेल तर द्रव्यसंचय करण्याचे बंद पडून सर्वांचेच नुकसान होईल, व समाजाची घडी विस्कळून सर्वत्र अनवस्था होईल हें निर्विवाद आहे. परंतु या नियमासहि अपवाद आहेत. चेोहींकडे दुष्काळ पडल्यामुळे विकत, मजुरी करून, किंवा धर्मार्थहि अन्न मिळत नाहीं अशी आपति प्राप्त झाल्यावर, चोरीनें आत्मसंरक्षण करण्याचे कोणी मनांत आणिल्यास त्यास आपण पापी समजूंकाय ? बारा वर्षदुष्काळ पडून विश्वामित्रावर असाच दुर्धर प्रसंग आल्यामुळे श्वपचाच्या म्हणजे मांगाच्या घरची कुत्र्याच्या मांसाची तैगडी चोरून त्या अभक्ष्य अन्नानें आपला बचाव करण्यास तो प्रवृत्त