पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मजिज्ञासा 3 а ग्रीनसाहेब* अशा प्रसंगाचा उपन्यास करून या वेळीं नीतिशास्र मनुष्याच्या संशयाची निवृति करूं शकत नाही असें स्वच्छ सांगतात; आणि अखेरीस असा सिद्धान्तकरितात कीं,“केाणताहि सामान्य नियमकेवळ नियम म्हणूनच सदैव पाळण्यामध्यें कांहीं महत्त्व आहे असें न म्हणतां, * सामान्यतः’ तो पाळण्यांत आपलें श्रेय आहे, एवढेच नीतिशास्राचे सांगणे आहे.कारण,अशा वेळीं आपण केवळ नीतीसाठीं आपल्या लोभमूलक हलक्या मनोवृत्तींचा त्याग करण्यास शिकत असते.”नीतिशास्रा वरग्रंथ लिहिणाच्या बेन, व्हेवेल वगेर दुसच्या इंग्रजी पंडितांचे मतहि असेंच आहे.$ वरील ईग्रज ग्रंथकारांच्या मतांची आमच्या धर्मशास्त्रकारांनीं घालून दिलेल्या तुलना केल्यास सत्याबद्दल अधिक आभमानी कोण हें सहज लक्षगुंत यझेल:-- न नर्मयुक्त वचर्न हिनाति न रूोषु राजन्न विवाहकाले । प्राणात्यये सर्वधनापहारे पंचानृतान्याहुरपातकानि ॥ “थटेंत, बायकांजवळ, विवाहकार्ला, प्राणावर संकट आले असतां आणि मिळकत बचावण्यासाठीं,मिळून पांच ठिकाणीं अनृत बोलणें पातक नाहीं”(मभा.आ.८२.१६; त्याप्रमाणेच शां. १०९व मनु.८.११०पहा), असें आमच्या शास्रांत म्हटलें आह खरें. पण त्याचा अर्थ स्रियांशीं नहमींच खोटें बोलावें असा नसून सिज्विकसाहेबानें ज्या अर्थानें “लहान मुलें, वेडे, किंवा आजारी” यांबद्दल अपवाद सांगितला आहे तोच अर्थ महाभारतांतहि अभिप्रेत आहे. परंतु पारलौकिक व आध्यात्मिक दृष्टि गुंडाळून ठेवणाच्या इंग्रज ग्रंथकारांनीं याहि पलीकडे जाऊन व्यापाच्यांनीदेखील आपल्या फायद्यासाठी खेोटें बोललें तरी चालेल असें जं उजळ माथ्यानें प्रतिपादन केले आहे, तें मात्र आमच्या शास्रकारांनी कधींच मान्य केलेलें नाहीं. केवळ सत्यशब्दोच्चारण म्हणजे नुस्तें वाचिक सत्य आणि सर्वभूतहित म्हणजे वास्तविक सत्य, या दोहींमध्यें जेथे विरोध येतो तेथे व्यवहारदृष्टया अपरिहार्य म्हणून असत्य बोलून निर्वाह करून घेण्यास कांही ठिकाणी त्यांनी परवानगी दिली आहे खरी. तथापि सत्यादि नीतिधर्म त्यांच्या मतें नित्य म्हणजे सर्वकाली एकसारखेच अबाधित असल्यामुळे पारलौकिकदृष्टया सामान्यतः हें थोडें तरी पापच होय असें ठरवून त्यासाठी त्यांनी प्रायश्विनें सांगितली आहेत. ही प्राय

  • Green's Prolegomena to Ethics,8315. P. 379 (5th Cheaper edition).

§ Bain's Mental and Moral Science, p. 445 (Ed. 1375); and Whewell's Elements of Morality, Book II. Chaps, XIII and XIV. (4th Ed. 1864). -