पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ गीतारहस्य अथवा कर्मयोग बलच्या नव्या करारांत दाखल असून, प्राचीन ख्रिस्ती धर्मेौपदेशक कित्येकदां याच प्रमाणें आचरण करीत, असें ख्रिस्ती धर्माचा इतिहासकार मिलमन यानें म्हटलें आहे. कोणालाहि थापादेऊन किंवा फसवून बाटविणेहें वर्तमानकालीन पाश्चिमात्य नीतिशास्रज्ञ प्रायः न्याय्य मानणार नाहीत. तथापि सत्यधर्म निरपवाद आहे असें तेहि म्हणत नाहीत. उदाहरणार्थ, ज्या सिज्विक नामक पंडिताचा नीतिशास्रावरील ग्रंथ हल्लीं आमच्या पाठशाळांतून पढविला जातो त्याचाच गोष्ट घ्या.सिज्विक हा कर्माकर्मसंशयाच्या स्थला“पुष्कळांचे पुष्कळ सुख'या तत्त्वाच्या आधारें नीतिनिर्णय करीत असते, व तीच कसोटी लावून त्यानें अखेरीस असें ठरावलें आह कीं, असल्या प्रसंगीं “लहान मुलांस, वेड्यांस, आजारी माणसांस (खरें सांगितल्यानें त्यांच्या प्रकृतीस अपाय होणार असल्यास), आपल्या शत्रूस, चेोरांस, आणि (न बोलतांवेळ निभत नसल्यास)आपल्याला अन्यायानें जेो प्रश्न करितो त्यास उत्तरदेतांना,केिवा वकालांनीं आपल्या धंद्यांत, खोटें बोलणेंगैर नाहीं.”:. मिल्ल याच्या नीतिशास्रावरील ग्रंथांत याच अपवादाचा समावेश केलेला आहे. याअपवादांखेरीज सिज्विक आपल्या ग्रंथांत आणखी असेंहि लिहितो की, “सर्वानों सत्यानें वागावें असें जरी आपण म्हणतों तरी ज्या राजकीय पुरुषांस आपले कारस्थान गुप्त ठेवावयाचे असतें त्यांनीं इतरांस किंवा व्यापाच्यांनी गि-हाइकांसनेहमी खरेंच सांगावें असें आम्ही म्हणतनाही.”jतिसच्या ठिकाणीं अशाच प्रकारची सवलत पाद्री भटांस आणि शिपायांस असत्ये अंसें त्याचे म्हणणे आहे. आधिभौतिक दृष्टीनें नीतिशास्राचा ऊहापोह करणारा लेस्ले स्टीफन नांवाचा आणखी एक इंग्रज ग्रंथकार अशाच प्रकारची दुसरीं उदाहरणें देऊन अखेरीस असें लिहितों की, “माझ्या मतें कोणत्याहि कृत्याचा परिणाम काय होतो इकडे लक्ष पुरवूनच त्याची नीतिमत्ता ठरावली पाहिजे. खोटें बोलल्यानेंच एकंदरीत आधक कल्याण आह अशी जर माझी खातरी असेल तर सत्य बोलण्यास मी धजणार नाहीं; आणि ही खातरी अशा प्रकारचीहि असू शकेल की त्यावेळी खोटें बोलणें हेंच माझें कर्तव्य आहे असे मी समजेन.”*नीतिशास्राचा अध्यात्मदृष्टीनें विचार करणारे Sidgwick's Methods of Ethics, Book III. Chap, XIS 6. p. 355 (.7th Ed.). Also, see pp. 315–317 (same Ed.). t Mill's Utilitarianism, ီ|ိ II. pp. 33-34 ( 15th Ed. Longmans 1907 ). I Sidgwick's Methods of Ethics, Book IV. Chap, III § 7. p. 454 ( 7 th Ed. ); and Book II, Chap. V. § 3 p 169.

  • Leslie Stephen's Seience of Rthics, Chap. fX § 29. p. 369 (2nd. Ed.), “And the certainty might be of such a kind as to make me think it a duty to lie.”