पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रविश. २१ न होईल तर तो संप्रदाय सर्वस्वी अप्रमाण ठरून लोकास अमान्य होईल. ह्मणून वैदिक धर्मीचे कितीहि संप्रदाय असले तरी कांही विशिष्ट गोष्टी खेरीजकरून-उदाहरणार्थ ईश्वर, जीव व जगत्यांचा परस्पर संबंध-बाकीच्या गोष्टी या सर्व संप्रदायांतून एकच असतात;व त्यामुळे आमच्या धर्मातील प्रमाणभूत ग्रंथांवर जीं सांप्रदायिक भाष्यें अगर टीका आहेत त्यांतून मूळ ग्रंथांतील शेंकडा नव्वदाहून अधिक पडतो तो बाकी राहिलेल्या वचनांसंबंधानें होय. त्या वचनांचा सरळ अर्थघेतला तर तो सर्व संप्रदायांस एकसारखाच अनुकूल असणें संभवनीय नाही.यासाठी यांपैकीी जीं वचनें आपल्या संप्रदायास अनुकूल असतीलतेवढींच प्रधान व इतर गौण मानून,अगर प्रतिकूल वचनांचा अर्थ युक्तीनें फिरवून,किवा साधलतेथे सोप्या व सरळ वचनांतूनच आपल्याला अनुकूल असा श्रेटेषार्थ व अनुमानें काढून, आपलाच संप्रदाय त्या ग्रंथां उदाहरणार्थ,गीता २.१२व१६;३.१९;६.३:आणि१८.२ वरील आमची टीका पही. पण अशा रीतीनें एखाद्या ग्रंथाचे तात्पर्य ठरावणे, आणि आपलाच संप्रदाय गीतंत प्रतिपाद्य असला पाहिजे असा किंवा दुसरा कोणताहि अभिमान नठेवितांसमग्रग्रंथाचे स्वतंत्ररीत्या प्रथम परिक्षण करून केवळ त्यावरूनच त्यांतील मथितार्थ काढणे, या दोन गोष्टी स्वभावतःच अत्यंत भिन्न आहेत, हें कोणाच्याहि सहज लक्षांत येईल. ग्रंथतात्पर्यनिर्णयाची सांप्रदायिक दृष्टि सदोष म्हणून सोडून दिली, तर गीतेचे तात्पर्य काढण्यास दुसरें साधन काय तें सांगितले पाहिजे. ग्रंथ, प्रकरण किंवा वाक्यें यांचा अर्थनिर्णय करण्याच्या कामांत अत्यंत कुशल जे मीमांसक त्यांचा या बाबतींत सर्वस मान्य झालेला खाली लिहिल्याप्रमाणें एक जुना श्लोक आहे उपृक्रमोपसंहारौ अभ्यासोऽपूर्वता फूलम् । अर्थवादोपपत्ती च लिंगं तात्पर्यनिर्णये ॥ मीमांसक म्हणतात कीं, कोणत्याहि लेखाचें, प्रकरणाचे किंवा ग्रंथाचे तात्पर्य काढणे असल्यास वरील लोकांत सांगितलेल्या सात गोष्टी साधनीभूत(लिंग) असून त्या सातहि गोष्टींचा विचार अवश्य केला पाहिजे. पैकीं, ‘उपक्रमोपसंहारौ' म्हणजे ग्रंथाचा आरंभ आणि शेवट या पहिल्या दोन गोष्टी होत. कोणीहि झाला तरी तो मनामध्यें कांहीं विाशष्टहेतु धरून ग्रंथ लिहिण्यास सुरुवात करितो;आणि सदर विशिष्ट उद्देश सिद्ध झाल्यावर ग्रंथ समाप्त करितो. म्हणून ग्रंथाचा उपक्रम आणि उपसंहार देतांना भूमेितिशास्रांत असें सांगतात कीं, आरंभीच्या बिंदूपासून जी रेघ डाव्याउजव्या बाजूस किंवा खालीं वर न कलतां शेवटच्या बिंदूपर्यंत नीट जात्ये तिला