पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* R गीतारहस्य अथवा कर्मयोग. सरळ रेघ म्हणावें. ग्रंथाच्या तात्पर्यास हाच न्याय लागू आहे. जें तात्पर्य ग्रंथाचा आरंभ आणि शेवट यांस न सोडितां या दोन टोकांमध्यें नीट बसतें तेंच त्या ग्रंथाचे सरळ तात्पर्य होय. प्रारंभापासून शेवटपर्यंत जाण्यास दुसच्या वाटा असल्या तर त्या सर्व वांकड्या किंवा आडवाटा समजल्या पाहिजेत. आद्यन्त पाहून अशा रीतीनें ग्रंथाचे तात्पर्य काय याची दिशा प्रथम निश्चित केल्यावर, त्या ग्रंथांत ‘अभ्यास’ म्हणजे पुनरुक्ति किंवा वारंवार काय सांगितले आहे ते पहावें. कारण, ग्रंथकाराच्या मनांत जी गोष्ट सिद्ध करावयाची असत्ये तिच्या समर्थनार्थ ती अनेक वेळीं अनेक कारणे दाखवून दर वेळा “म्हणून ही गोष्ट सिद्ध झाली” किंवा “म्हणून अमुककेलें पाहिजे ” असा पुनःपुनः एकच निश्चित सिद्धान्त सांगत असते. ग्रंथतात्पर्य काढण्याचा चवथी आणि पांचवी साधनें ‘अपूर्वता’ आणि ‘फल' ही होत.‘अपूर्वता’ म्हणजे नवेपणा. कोणताहि ग्रंथकार आपणास कांहीं नवं सांगणे असल्याखेरीज प्राय: नवीन ग्रंथ लिहिण्यास प्रवृत्त होत नाही; निदान छापखाने नव्हते तेव्हां तरी होत नसे ! म्हणून एखाद्या ग्रंथाचे तात्पर्य ठरविण्यापूर्वी त्या ग्रंथांत अपूर्वाई, वैशिष्टय किवा नवेपण काय आहे हें पहावें लागतें. तसेंच त्या लेखाचें अगर ग्रंथाचें कांहीं फल, अर्थात् त्या लेखामुळे अगर ग्रंथामुळे कांहीं परिणाम, घडून आला असल्यास तो केोणता इकडेहि लक्ष पुरावले पाहिजे. कारण, हें फल मिळावें किवा व्हावें या हेतूनेंच ग्रंथ लिहिला असल्यामुळे घडलेल्या परिणामावरून ग्रंथकत्र्याचा आशय आधक व्यक्त होत असतो. सहावें व सातवें साधन “ अर्थवाद ? व * उपपात’ हीं होत. * अर्थवाद ? हा मीमांसकांचा पारिभाषिक शब्द आह (जै.सू.१.२,१-१८). आपणास मुख्यतः कोणत्या गोष्टीचे विधान करावयाचे दाखल्यासाठी, तुलना करून एकवाक्यता करण्यास,अगर साम्य व भेद दाखविण्यास प्रतिपक्षांतील दोष सांगून स्वपक्षाचे मंडण करण्यास, अलंकारार्थ, अतिशयोक्तीनें, किंवा युक्तिवादाला पोषक म्हणून त्या प्रश्नाचा पूर्व इतिहास या नात्यानें, अथवा दुस-या कांहीं कारणांसाठीं, आणि कधी कधी कांहीं विशिष्ट कारणावांचूनहि, ग्रंथकार दुसच्या पुष्कळ गोष्टीचे प्रसंगानुसार वर्णन करीत असतो. अशावेळीं ग्रंथकार जीं वर्णनें करितो ती सर्वस्वी मुद्दयाला सोडून नसली तरी नुस्ती गौरवार्थ, स्पष्टीकरणार्थ किंवा भरतीसाठी केलेली असल्यामुळे ती अक्षरश:नेहमीच खरीं असतील असा नेम नाही.*किंबहुना ग्रंथकार असल्या विधानासंबंधानें ती अक्षरशःखरीं आहेतकीं नाहींत हें पहाण्याची विशेष सावधागरीहि धत नसतो म्हटले तरी चालेल. म्हणून तीं

  • अर्थवादांतील वर्णनवस्तुस्थितीलाधरून असेल तर त्यास ‘अनुवाद् ? विरुद्ध असेल तर त्यास“गुणबाद’ आणि याहून भिन्न प्रकारचे असेल तर त्याला ‘ भूतार्थवाद ’ अशी तीन