पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० र्गातारहस्य अथवा कर्मयोग. प्रवृत्तिपर, तर पुढे झालेले अनेक विद्वान् आचार्य, कवि, योगी किवा भगवद्भक्त यांनीं आपआपल्या संप्रदायानुरूप प्रतिपादन केलेली शुद्ध निवृतिपर, अशीं भगवद्गीतेचीं अनेक प्रकारचीं तात्पर्ये पाहून कोणीहि मनुष्य गोंधळून सहज असा प्रश्न करील कीं, हीं परस्परविरोधी अनेक तात्पर्ये एकाच ग्रंथांतून निघणे शक्य आहे काय ? आणि शक्यच काय पण इष्टहि आहे, असें म्हटलें तर तसे असण्याचा हेतु काय ? निरनिराळे भाष्यकर्त आचार्य विद्वान्, धार्मिक व अत्यंत सत्त्वशील होते याबद्दल कोणासहेि शंका नाहीं. किंबहुना श्रीशंकराचार्यासारखे महातत्त्वज्ञानी आजपर्यंत जगांत झाले नाहीत म्हटलें तरी चालेल. मग त्यांच्यामध्ये व पुढील आचार्यामध्यें एवढा मतभेद कां ? गीता म्हणजे कांहीं गौडबंगाल नव्हे, की त्यांतून पाहिजे त्यानें पाहिजे तो अर्थ काढावा. वरील सर्व संप्रदाय निघण्यापूर्वी गीता निर्माण झालेली असूनही गीता श्रीकृष्णांनीं अर्जुनाचा भ्रम वाढविण्यासाठी नव्हे तर तो दूर करण्यासाठी सांगितली आहे; अॅाणि तीत एकाच विशिष्ट निश्चितार्थाचा अर्जुनास उपदेश केला असून (गी. ५. १, २), त्या उपदेशाचा अर्जुनावर परिणामहि तसाच झालेला आहे. मग गीतेच्या तात्पर्यार्थीबद्दल एवढी भानगड का ? प्रश्न कठिण दिसतो खरा. पण त्याचे उत्तर सकृद्दर्शनी वाटतें तितकें कठिण नाही. समजा की, एखादें गेोड व सुरस पक्वान्न पाहून एकानें तें गव्हाचे, दुसच्यानें तुपाचे व तिसच्यानें साखरेचे आहे असें आपआपल्या अभिरुचीप्रमाणे म्हटलें, तर त्यांपैकीं आपण कोणतें खोटें मानणार? तिघेहि आपआपल्यापरी खरेच आहेत; आणि इतकें झाले तरी तें पक्वान्न कोणतें हा प्रश्न पुनः शिल्लक राहतो तो राहतोच. कारण, गहूं, तूप आणि साखर हे तिन्ही करितां येण्यासारखी असल्यामुळे, त्यांपैकी प्रस्तुत पक्वान्न कोणतें याचा निर्णय गोधूमप्रधान, घृतप्रधान किंवा शर्कराप्रधान आहे, एवढे म्हटल्यानेंच होऊं शकत नाहीं. लक्ष्मी, ऐरावत, कौस्तुभ, पारिजात बगैरे निरनिराळ्या वस्तु मिळाल्या, तरीतेवढधानें समुद्राच्या वास्तविक स्वरूपाचा निर्णय झाला नाहीं, तद्वतच सांप्रदायिकरीत्या वधाचे वेळीं रंगमंडपांत शिरलेले एकच भगवान् श्रीकृष्ण ज्याप्रमाणे प्रत्येक प्रेक्ष आपल्या पुत्रासारखे इत्यादिप्रकारें भासले(भाग. १०.पू. ४३.१७), त्याप्रमाणे भगवद्गीता एकच असतांहि निरनिराळ्या सांप्रदायिकांस ती निरनिराळी दिसू लागली आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. कोणताहि धर्मसंप्रदाय घेतला तरी सामान्यतः ती प्रमाणभूत धर्मग्रंथास अनुसरूनच असला पाहिजे हें उघड आहे; कारण, तसें