पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रवेश, 3\ף निष्काम कर्म श्रेष्ठ-इत्यादि कांहीं गीतावचनेंहि या सिद्धान्ताच्या विरुद्ध आहेत; पण ती अक्षरश:खरी नसून अर्थवादात्मक समजावी,असें गीतेवरील माध्वभाष्यांत लिहिलें आहे(गी. माभा. १२.१३).चवथा संप्रदाय श्रीवल्लभाचार्य[जन्मशक १४०१] यांचा होय. रामानुज व माध्व यांच्या संप्रदायांप्रमाणे हा संप्रदायहि वैष्णवपंथी आहे. पण विशिष्टाद्वैती किंवा द्वैती मानितात त्यपक्षां जीव, जगत्व ईश्वर यासंबंधानें या पंथाचे मत निराळे आहे. मायावरहित म्हणजे शुद्ध जीव व परब्रह्म हीं एकच आहेत, दोन नव्हेत, हें मत या संप्रदायास मान्य आहे; व म्हणूनच यास ‘शुद्धाद्वैती’ म्हणतात. तथापि, श्रीशंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणें जीव व व्रह्म एकच न मानितां अग्नीच्या ठिणग्यांप्रमाणे जीव हे ईश्वराचे अंश होत,मायात्मक जगत् मिथ्या नसून माया ही एक परमेश्वराच्या इच्छेनें ईश्वरापासून विभक्त झालेली शक्ति आहे, आणि मायापरतंत्र झालेल्या जीवास मोक्षप्राप्त्यर्थ लागणारें ज्ञान ईश्वरानुग्रहाखेरीज होणे शक्य नसल्यामुळे भगवद्भक्ति हेंच काय तें मोक्षाचे मुख्य साधन हीय, असे या पंथाचे जे दुसरे सिद्धान्त आहेत त्यांमुळे शांकर संप्रदायाहून हा संप्रदाय भिन्न झाला आह.परमेश्वराच्या या अनुग्रहासच'पुष्टि,“पोषण'हीं दुसरीं नांवें असल्यानें या संप्रदायास“पुष्टिमार्ग' असें म्हणण्याचाहि प्रघात आहे. या संप्रदायाचे गीतेवर तत्त्वदपिकादि जे ग्रंथ आहेत त्यांत असें ठरविले आहे कीं, सांख्यज्ञान व कर्मयेोग हीं अर्जुनास प्रथम सांगून अखेर त्यास भक्त्यमृत पाजून ज्या अर्थी भगवंतांनी कृतकृत्य केले आहे,त्याअर्थी भक्ति-आणि त्यांतल्यात्यांतहि घरदार सोडून देऊन केवळ निवृतिपर पुष्टिमागीय भक्ति-हेंच सर्व गीतेचे तात्पर्य होय; आणि याच हेतूनें भगवंतांनी “सर्व धर्मीन् परित्यज्य मामेकं शरणं त्रज’ (गी. १८.६६) सर्वे धर्मे सोडून मला एकट्यालाच शरण ये,-असा शेवटी उपदेश केला आहे. याखेरीज निंबार्क यांचाहि एक राधाकृष्णभक्तिपर वैष्णव संप्रदाय आहे. हे आचार्थ रामानुजाचार्यानंतर व मध्वाचार्यापूर्वी म्हणजे शके १०८४ चे सुमारास झाले असावे असें डॅक्टर भांडारकर यांनी ठरविलें आहे. जीव, जगत् व ईश्वर यांसंबंधानें निंबाकीचार्याचे असें मत आहे कीं, हे तिन्ही जरी भिन्न असले तरी जीव व जगत् यांचे व्यापार व अस्तित्व स्वतंत्र नसून ईश्वरेच्छेवर अवलंबून आहेत, आणि मूळ परमेश्वरांतच जीव व जगत् यांचीं सूक्ष्मतत्त्वें अंतर्भूत असतात. हें मत सिद्ध करण्यास निंबार्कानीवेदान्तसूत्रांवर एक स्वतंत्र भाष्य लिहिले आहे; व या संप्रदायांतील केशव काश्मीरिभट्टाचार्य यांनी भगवद्गीतेवर ‘तत्वप्रकाशका' नांवाची एकूटीकाहिलिहिली असून तीतगीतार्थ याच संप्रदायास अनुकूल आहे असे दाखविलें आहे.रामानुजाचार्याच्या विशिष्टाद्वैतापासून या संप्रदायाचाभेद दाखविण्यास यास ‘द्वैताद्वैती संप्रदाय’ असे म्हणतां येईल. डोळयांना प्रत्यक्ष दिसणाच्या वस्तु खच्या मानिल्याखेरीज व्यक्ताची उपासना म्हणजे गीता र. २