पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ गीतारहस्य अथवा कर्मयेोग. मुळे गीतंत प्रवृत्तिपर कर्मयोग प्रतिपाद्य आहे ही गोष्ट वास्तविकरीत्या त्यांच्या लक्षांत यावयास पाहिजे हेोती. पण रामानुजाचार्याच्या वेळी मूळ भागवतधर्मातील कर्मयेोग बहुतक लुप्त हेाऊन त्यास तत्त्वज्ञानदृष्टया विशिष्टाद्वैती, व आचरणदृष्टया प्राधान्येंकरून भक्तिपर स्वरूप प्राप्त झाललें असल्यामुळे, गीतेंत ज्ञान, कर्म व भक्ति हीं तिन्ही जरी वर्णिली असली तरी तत्त्वज्ञानदृष्टया विशिष्टाद्वैत व आचरणदृष्टया वासुदेवभक्ति हेंच गीतेचे सार असून कर्मनिष्टा ही ज्ञाननिछेची निष्पादक आहे, स्वतंत्र नव्हे, असा रामानुजाचार्यानीहि निर्णयकेला आहे (गी. राभा.१८.१ व ३.१ पहा). परंतु अद्वैतज्ञानाऐवजी विशिष्टाद्वैत आणि संन्यासाऐवजीं भक्ति असा जरी शांकरसंप्रदायांत रामानुजाचार्थानी फरककेला, तरी आचरणदृष्टया भक्ति हेंच अखेरचे कर्तव्य मानिल्यानें चातुर्वण्याची स्वधर्मेक्ति सांसारिककर्म आमरणान्त करणे हा पक्ष गौण ठरतो; व त्यामुळे गीतेचे रामानुजयि तात्पर्यहि एक प्रकारें कर्मसंन्यासपरच आहे, असें म्हटलें पाहिजे. कारण, कर्माना चित्त शुद्ध होऊन ज्ञान झाल्यावर चतुर्थीश्रम घऊन ब्रह्मचिंतनांत गढून राहिलें काय, किंवाप्रेमानें निस्सीम वासुदेवभक्तींत रंगून गेलें काथ, दोन्हीहि मागे कर्मयोगदृष्ट्या एकाच मासल्याचे म्हणजे निवृतिपर होतात. आणि हाच आक्षेप रामानुजाचार्यानंतर निघालेल्या संप्रद्वायांसहि लागू पडतो. मायामिथूयात्ववाद खरानसून वासुदेवभक्तनेिंच अखेरमोक्ष मिळतो, इत्यादि रामानुजाचार्याचे सिद्धान्त जरी बरोबर असले, तरी परब्रह्म व जीव कांहीं अंशीं एक व कांही अंशी भिन्न मानणें परस्परविरुद्ध असून असंबद्ध होय; म्हणून दोन्हीहि सदैव भिन्नच मानिले पाहिजेत, पूर्णपणें केिवा अंशेत.हि त्यांचे ऐक्य होणें शक्य नाही, असें श्रीरामानुजाचार्यानंतर निघालल्या तिसच्या संप्रदायाचे मत आहे. त्यामुळे त्यास “ द्वैती संप्रदाय ” असें म्हणतात. या संप्रदायाचे प्रवर्तक श्रीमध्वाचार्य ऊर्फ श्रीमदानंदतीर्थहे शके ११२० साली समाधिस्थ झाले व तेव्हां त्यांचे वय ७९ वर्षांचे होतें असें माध्व संप्रदायांतील लेकांचे म्हणणें आह. पण डाक्टर भांडारकरधांनी "वैष्णव शैव व इतर पंथ” म्हणून जो एक इंग्रजी ग्रंथ नुक्ताच प्रसिद्ध केलं आह त्यांत (पृ.५९) मध्वाचार्याचा कालशके १११९ त ११९८पर्यतचा होय असें शिलालेखादि अन्य प्रमाणांवरून निश्चित केले आहे. श्रीमध्वाचार्यांनी प्रस्थानत्रयीवर-अर्थात् गीतेवरहि-जीं भाष्यं आहत त्यांतून हे सर्व ग्रंथ द्वैतमतप्रतिपादकच आहत असें त्यांनी दाखविलें आह. गीतवरोल आपल्या भाष्यांत ते असें म्हणतात की, निष्काम कर्माची महती गीतेंत जरी वर्णिली असली, तरी निष्काम कर्म हुं साधन असून भक्ति ह्री अखेरवी निष्ठा ह्येय. भक्ति सिद्ध झाल्या. नंतर कर्म केलें काय आणि न केलें काय त्यांत कांहीं विशेष नाहीं. ‘ध्यानात कर्मफलत्यागः ”-परमेश्वराच्या ध्यानापेक्षां म्हणजे भक्तोपेक्षां कर्मफलत्याग म्हणज