पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3 z गीतारहस्य अथवा कर्मयेोग. भक्ति निराधार किंवा कांहीं अंशीं तरी लटकी पडत्ये अशा समजुतीनें शांकर संप्रदायांतील मायावाद न स्वीकारितां द्वैत्यांचे किंवा विाशष्टाद्वैत्यांचे हे निरनिराळे भक्तिपर संप्रदाय प्रवृत्त झालेले आहेत, हें उघड आहे. पण भक्तीची उपपति लागण्यास अद्वैत व मायावाद सेोडूनच दिला पाहिजे असें म्हणतांयेत नाही. कारण, मायावाद व औद्वैत स्वीकारूनहि महाराष्ट्रांतील साधुसंतांनी भक्तीचे समर्थन केलें असून, हा पंथ श्रीशंकराचायोच्या पूर्वीपासून चालत आलेला आहे असें दिसून येतें. औद्वैत, मायामिथ्यात्व व कर्मत्यागावश्यकता हे शांकर संप्रदायाचे सिद्धान्त या पंथांत ग्राह्य धरल जातात. पण व्रह्मात्मैक्यरूप मोक्ष प्राप्त होण्यास जी अनेक साधनें अाहेत, त्यांपैकी भक्तिमार्ग हें साधन अत्यंत सुलभ होय, “तुज व्हावा आहे देव । तरी हा सुलभ उपाव” (तुका.गा.३००२.२), असा तुकारामबोवांप्रमाणें या पंथांतील लोकांचा सर्वास उपदेश असून भगवद्गीतंतहि“क्लेशेाऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्” (गी.१२.५)-अव्यक्त ब्रह्माचे ठाया चित्त लागणें अधिक क्लेशमय आहे—असें प्रथम कारण दाखवून, पुढे “भक्तास्तेऽतीव मे प्रियाः”-माझे भक्तच मला अतिशय् प्रिय होत(गी.१२.२०), -असें ज्या अर्थी भगवंतांनीच अर्जुनास सांगितलें आहे, त्या अर्थी अद्वैतपर्यवसायी भक्तिमार्गच गीतेंतला मुख्य प्रतिपाद्य विषय होय असें त्यांचे म्हणणे आहे. श्रीधरस्वामानों आपल्या गीतेवरील टीकेंत (गी.१८.७८) गीतेचें जें तात्पर्य काढिलें आहे तें याच प्रकारचे आहे. पण था संप्रदायाचा गीतेवरील मराठी पण उत्तम ग्रंथ म्हटला म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ हा होय. यांत गीतेच्या अठरा अध्यायांपैकीं पहिल्या चोहोंत कर्म,व दुसच्या सातांत उपासना आणि पुढील अध्यायांतून ज्ञान प्रतिपाद्य आहे असें म्हटलें असून,आपण आपली टीका “भाष्यकारांतें(शंकराचार्यास)वाट पुसत” रचिली असें ज्ञानेश्वरांनी स्वतः आपल्या ग्रंथाच्या म्हटले आहे. तथापि गीतेचा अर्थ अनेकसरस दृष्टांतांनीं फुलवून सांगण्याची ज्ञानेश्वरमहाराजांची शैली अलौकिक असून श्रीशंकराचार्यापेक्षां विशेषतः भक्तिमार्गाचेव कांहीं अंशी निष्काम कर्माचेहि त्यांनी समर्थन केलें असल्यामुळे, ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा एक स्वतंत्रच ग्रंथ मानिला पाहिजे. ज्ञानेश्वरमहाराज हे स्वतः येोगी होते. म्हणून गीतेच्या सहाव्या अध्यायांत पातंजलयेोगाभ्यासाचा विषय ज्या श्लेोकांत आला आहे त्यांवर यांची विस्तृतटीका असून त्यांचे असें म्हणणे आहेकीं, अध्यायाच्याशवर्टी “तस्माद्योगी भवार्जुन ”-यासाठीं हे अर्जुना ! तूं योगी म्हणजे येागाभ्यासांतप्रवीण हो (गी.६.४६),-असें अर्जुनास सांगून सर्व मोक्षपंथांतपातंजल येोगासच भगवंतांनी ‘पंथराजु ? म्हणजे सर्वेोत्तम पंथ ठरविलेंआहे. सारांश, गीतेंत उपदेशलेला प्रवृतिपर कर्ममार्गे गौण म्हणजे ज्ञानाचेंकेवळ साधन ठरवून आपआपल्या संप्रदायांत जें जें तत्त्वज्ञान आणि त्याबरोबरच मेाक्षदृष्टया अखेरचें कर्तव्य