पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रवेश a Uན་ त्यांनी या बाबतीत मुख्यत्वेकरून आचार्यौचेच अनुकरण केले आहे. तथापि पुढे आणखी अशी एक चमत्कारिक कल्पना निघाली की, अद्वैत मताच्या मूलभूत महावाक्यांपैकी“तत्त्वमास”-तें(परब्रह्म)तूं(श्वेतकेतु) आहेस-असें जें छादोग्योपनिषदांतील मुख्य महावाक्य त्याचेच गीतेच्या अठरा अध्यायांत विवरण अहि.पण महावाक्यांतील पदांचा क्रम बदलून पहिल्यानें 'त्वं’व नंतर“तत् आर्ण ‘असेि’ हीं पदें घेऊन या नव्या क्रमाप्रमाणें प्रत्येकास गीतेचे आरंभापासून सहासह अध्याय भगवंतांनी नि:पक्षपातबुद्धीनें सारखेसारखे वांटून दिले आहेत : गीतेवरील पैशाच भाष्य हें कोणत्याहि संप्रदायाचे नसून स्वतंत्र आहे, व तें हनुमानानें म्हणजे मारुतीनें लिहिलें, अशी कितेयकांची समजूत आह. पण खरा प्रकार तसा नाही. भागवतावरील टीकाकार हनुमान पंडित थानेंच हें भाष्यकेलेलें असून तें संन्यासमार्गाचे आहे; आणि त्यांत कांही कांही ठिकाणीं शांकर भाष्यांतील अर्थच शब्दशः दिलेले आहेत. तसेंच पृवीं व अलीकडे गीतेचीं मराठीत जी भाषांतरें किंवा निरूपणे झालेली आहेत तीहि प्रायः शांकरभाष्यानुसारी असून, प्रो. मॅक्सू मुल्लर यांनी प्रासद्ध केलेल्या“प्राच्य धर्मपुस्तक' मालेतकै.काशीनाथपंत तेलंग यांना केलेलें भगवदूतीतेचें ईग्रजी भाषांतरहि होईल तेवढं श्रीशंकराचार्य व शांकरसंप्रदाय टीकाकार यांस अनुसरून केलेले आहे, असें सदर भाषांतरास जोडलेल्या प्रस्तावनेच्या अखेर लिहिले आहे. गीता व प्रस्थानत्रयीतील इतर ग्रंथ यानर सांप्रदायिक भाष्य लिहिण्याचा प्रघात याप्रमाणें एकदांसुरू झाल्यावर पुढे इतर संप्रदायांतहित्यांचेच अनुकरण करण्यांत आले. मायावाद, अद्वैत व संन्यास प्रतिपादन करणाच्या शांकर संप्रदायानंतर सुमारें अडीचशे वर्षौनी श्रीरामानुजाचार्य [जन्मशक ९३८] यांनी विशिष्टादैतसंप्रदाय प्रवृत्त केलाः आणि तो सिद्ध करण्यास शंकराचार्याप्रमाणें रामानुजाचार्यानीहि प्रस्थानत्रयींवर (अर्थात् त्यांतच गीतेवरहि)स्वतंत्र भाष्यें लिहिली आहेत. श्रीशंकराचार्याचा मायार्मिथ्यात्ववाद आणि अद्वैतसिद्धान्त ही दोन्हीं खरी नसून जीव, जगत् व ईश्वर ही तीन तत्त्वें जरी भिन्न असली, तरी जीव (चित्) व जगत् ol. दोन्ही एका ईश्वराचेच शरीर असल्यामुळे चिदचिद्विशिष्ट ईश्वर एकच होय, व ईश्वरशरीरांतील या सूक्ष्म चिदाचदापासून पुढे स्थूल चित् व आचित् किंवा अनेक जीव व जगत् निर्माण हेातात, असें या संप्रदायाचे मत आहे, आणि तेंच मत उपनिषदें व ब्रह्मसूत्रे या दोहींत आणि गीतेंतहि प्रतिपाद्य आहे, असें रामानुजाचार्याचे तत्त्वज्ञानदृष्टया म्हणणे आहे (गी.रामा. २.१२:१३. २). किंबहुना भागवतधर्मात विाशष्टाद्वैत मत शिरण्यास यांचेच ग्रंथ कारण झाले आहत, असें म्हटलें तरी चालेल; कारण, तत्पूर्वी महाभारतांत व गीतेंत भागवतधर्माचे जें निरूपण आहे तें अद्वैत मत