पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ ^ ८ गीतारहस्य अथवा कर्मयोग आत्मविद्या सांगा” अशी मृत्यूपाशी तिसरी मागणी कली आहे. परंतु या तिसच्या वराच्या ऐवजीं आणखी संपतिदेतों असें जेव्हां मृत्यु ह्मणू लागला तेव्हां,-म्हणजे प्रेय:प्राप्तीला जरूर तवढे यज्ञादि कर्माचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचीच अधिक आशा न धरितां-‘ आतां श्रेयःप्राप्ति करून देणारं ब्रह्मज्ञानच मला सांगा” असा नाचकेतानें आग्रह धरिला आहे. सारांश, या उपनिषदाच्या शवटच्या मंत्रांत वर्णिल्याप्रमाणें ‘ब्रह्मविद्या’ व ‘योगविधि' म्हणजे यज्ञयागादि कर्मे ही दोन्ही प्राप्त करून घेऊन नचिकेत मुक्त झाला आहे ' कठ. ६.१८). यावरून ज्ञान व कर्म या दोहोंचा समुच्चय हेंच या उपनिषदाचे तात्पर्य होय असें सिद्ध होतें. इंद्राची एक गोष्ट याच प्रकारची आहे. इंद्राला स्वतः ब्रह्मज्ञान पूर्ण झालेलें होतें इतकेंच नव्हे, आहे. तथापि इंद्राचे राज्य जाऊन प्रल्हाद त्रैलोक्याधिपति झाल्यावर इंद्रानें देवांचा गुरु जेो बृहस्पति त्याजकडे जाऊन “श्रेय कशांत आहे तें मला सांगा” असा त्यास प्रश्न केला. तेव्हां बृहस्पतीनें राज्यभ्रन्न झालल्या इंद्रास ब्रह्मविद्या म्हणजे आत्मज्ञान सांगून ‘तेवढेच श्रेय” (एतावच्छेय इति) असें उत्तर दिलें. परंतु इंद्राचे त्यानें समाधान न होतां “आणखी जास्त कांही आहे काय?” (केो विशेषो भवेत्) असा पुनः प्रश्न केल्यावर बृहस्पतीनें त्याला शुक्राचार्याकडे पाठविले. तेथेंहि तसाच प्रकार झाल्यावर शुक्रानें “ प्रल्हादास तो विशेष माहीत आहे ” असें सांगितलें. तेव्हां अखेरीस ब्राह्मणवेषानें प्रल्हादाकडे जाऊन इंद्र त्याचा शिष्य झाला, व कांहीं काळ त्याची सेवा केल्यावर शील (सत्यानें व धर्मानें वागण्याचा स्वभाव) हीच त्रैलोक्याचे राज्य मिळविण्याची गुरुकिल्ला असून तेंच श्रेय होय, असें प्रल्हादानें त्यास सांगितल. नंतर, तुझ्या सेवेनें मी संतुष्ट झालेो, तूं मागशील तो वर मी तुला दतों, असे जेव्हां प्रल्हाद त्यास म्हणाला, तेव्हा “नुझें ‘शील मला दे”असा ब्राह्मणवेषधारी इंद्रानें वर मागितला. त्यास प्रल्हादानें होय म्हटल्यावर * शील ? व त्याचे मागोमाग धर्म, सत्य, वृत्त व अखेरीस श्री किवाऐश्वर्य या देवता प्रल्हादाच्या शरीरातून निघून इंद्राच्या शरीरांत प्रवेश कग्न्यिा झाल्या,व त्यामुळे पुढे इंद्राला आपलें राज्य प्राप्त झालं,अशा भारताच्या शातपर्वात (शां. १२४) भीष्मांनी युधिष्ठिरास एक प्राचीन कथा सांगितली आहे. नुस्त्या ऐश्वर्यापेक्षां नुस्तें आत्मज्ञान जरी अधिक योग्यतेचे असले तरी या जगांत ज्यास रहावृयाचे आहे त्यास लोकांप्रमाणेच ऐहिक समृद्धिहि आपणास किंवा आपल्या देशास प्राप्त करून घेण्याची अवश्यकता व नैतिक हुक्कहि असल्यामुळे मनुष्याचे या जगांत परम साध्य काय या प्रश्नासशांति वृ पुष्टि, प्रेय व श्रेय, किंवा ज्ञान व ऐश्वर्य या दोहोंचा समुच्चय, हंच आमच्या कर्मयोग. शास्राचे शेवटचे उत्तर आहे, असें या सुंदर कथेवरून उघड होतें. ज्या भगवाना