पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःखविवक ११९ पक्षां या जगांत दुसरा कोणीहि श्रेष्ठनाहीं, व ज्यांच्याच मार्गानें इतर लोक जात असतात (गी.३.२३), त्या भगवानांनी ऐश्वर्य व संपत्ति सेोडिलीं आहत काय? ऐश्वर्ड्स्य स्मफूम्य घमैस्य यशसः श्रियः । ज्ञानवैराग्ययोश्चेंव षण्णां भग इतीरणा । ‘‘समप्र. ऐश्वयै, धर्म, यशा, सैपत्ति, ज्ञान आाणि वैराग्य यासहृा गो ष्ठीस ‘भग’ म्हणतात” अशी भग शब्दाची व्याख्या पुराणांतून दिली आहे (विष्णु. ६. ५.७४ पहा). या लोकांत ऐश्वर्य या शब्दाचा अर्थ योगैश्वर्य असा करितातः कारण, श्री म्हणजे संपत्ति हा शब्द पुढे आलेला आहे. पण व्यवहारांत ऐश्वर्य या शब्दांत सत्ता, यश व संपत्ति आणि ज्ञानांतच वैराग्य व धर्म यांचा समावेश होत असल्यामुळे वरील श्वठोकांतील सर्व अर्थ, ज्ञान व ऐश्वर्य या दोन पदांनीच लैौकिकदृष्टया व्यक्त होतो असें म्हणण्यास हरकत नाहीं; आणि ज्या अर्थी ज्ञान व ऐश्वर्य यांची जोडी भगवंतांनीच अंगीकृत केलेली आहे त्या अर्थी तीच गोष्ट प्रमाण समजून इतरांनीहि वागले पाहिजे (गी. ३ २१: मभा.शां. ३४१.२५). आत्मज्ञानहेंच काय तें या जगांतील साध्य आह हा सिद्धान्त, संसार दु:खमय म्हणून तो अजीबात सोडून द्यावा असे म्हणणाच्या संन्यासमार्गाचा आहे, कर्मयोगाचा नव्हे; आणि भिन्नभिन्न मार्गौतील हे सिद्धान्त एकत्र करून गीतेच्या अर्थाचा विपर्यास करणें योग्य नाही. तथापि ज्ञानाखेरीज नुस्तें ऐश्वर्य आसुरी संपत् होय असें गीताच सांगत आहे. म्हणून ऐश्वर्याबरोबर ज्ञान व ज्ञानाबरोबरच ऐश्वर्य किंवा शान्ति आणि पुष्टि, या दोहोंचीहि जोडी नेहमीं कायम ठेविली पाहिजे असें सिद्ध होतें. ज्ञानाबरोबरच कां होईना, पण ऐश्वर्थ पाहिजे, असें म्हटल्यावर कर्म करणें ओघानेंच प्राप्त होतें. कारण, “कमीण्यारभमाणं हिपुरुषंश्रीर्निषेवते”(मनु.९.३००)* कर्मे करणाच्या पुरुषासच या जगांत श्री म्हणजे ऐश्वर्य मिळतें-असें मनूनें म्हटलें असून प्रत्यक्ष अनुभवानेंहि तीच गोष्ट सिद्ध होत्ये; आणि गीतेंत अर्जुनाला केलेला उपदेशहि तसाच आहे (गी. ३.८). मोक्षदृष्टया कर्माची जरूर नसल्यामुळे अखेर म्हणजे ज्ञानोत्तर सर्व कर्म सोडिलींच पाहिजेत असें यावर कित्येकांचे म्हणणे आह. पण सध्यां फक्त सुखदुःखांचाच विचार कर्तव्य असून शिवाय मोक्ष व कर्म यांच्या स्वरूपांचे परीक्षणहि अद्याप केलेले नसल्यामुळे या आक्षेपाचे उतर यथे सांगतां येत नाहीं. पुढे नवव्या व दहाव्या प्रकरणांत अध्यात्म व कर्मविपाक यांचें खुलासेवार विवेचन करून मग अकराव्या प्रकरणांत हा आक्षेपहि पोकळ आहे असें दाखविण्यांत येईल. सुख व दुःख या दोन भिन्न व स्वतंत्र वेदना आहत; सुखेच्छाकेवळ सुखोपभोगानें तृप्त होणे अशक्य असल्यामुळे संसारांत नेहमीं दुःखाचीच बेरीज अधिक