पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःखविवेक ११ ७ भौतिक सुखांत, किंवा सकृद्वर्शनीं गोड वाटणाच्या (प्रेय) वस्तूंस न भुलतां दूरवर नजर देऊन ज्यांत आपल्या आत्म्याचे श्रेय म्हणजे परिणामी कल्याण आह त्या आत्मविद्येचाच नचिकेतानें आग्रह धरून अखेर ती संपादन केला आहे. सारांश, आत्मबुद्धिप्रसादापासून होणाच्या केवळ बुद्धिगम्य सुखास किंवा अध्यात्मिक आनं* दासच आमचे शास्रकारश्रेष्ठ सुख मानीत असून, हें नित्य सुख आत्मवश असल्यामुळे सर्वास प्राप्त होण्यासारखें आहे,व सर्वानी तें संपादन करण्याचा प्रयत्न करावा, असा त्यांचा अभिप्राय आहे. पशुधमाँखेरीज मनुष्याचे म्हणून जें कांहीं विलक्षण किंवा विशिष्ट सुख आहे तें हेंच होय; व हा आत्मानंदकेवळ बाह्योपाधींवर कधींच अवलंबून रहात नसल्यामुळे तो सर्व सुखांत नित्य, स्वतंत्र व श्रेष्ठ आहे. त्यालाच गीतंत् निर्वाणीची शांति असें नांव असून ( गी. ६. १५ ), स्थितप्रज्ञांच्या ब्राह्मी अवस्थेतील परमावधीचे जें सुख तेंहिं हेंच होय ( गी, २.७ १; ६.२८; १२.१२; १८. ६२ पहा). आत्म्याची शांतिकिवा सुखहेच अत्यंतश्रेष्ठ सुख असून आत्मवश असल्यामुळे त सर्वानीं प्राप्त करून घेण्यासारखेंहि आहे. असा याप्रमाणें निर्णय झाला. पण सर्व धातूत सोनें अत्यंत मौल्यवान् ठरावल्यानें लोखंडादिइतर धातूंची गरज ज्याप्रमाणे नाहीशी होत नाहीं, किंवा साखर अत्यंत गोड असली तरी मिठावांचून ज्याप्रमाणे काम भागत नाहीं, तद्वतच आत्मसुखाची किंवा शांतीचीहि गोष्ट आहे. किमानपक्षी शरीरधारणार्थ तरी ऐहिक वस्तूंची जोड या शांतीस पाहिजे हें निर्विवाद आहे; आणि याच अभिप्रायानें आशीर्वादाच्या संकल्पांत नुस्तें ‘शांतिरस्तु' असें न ह्मणता “शांतिःपुष्टिस्तुष्टिश्चास्तु” म्हणजे शांतीबरोबरच पुष्टि व तुष्टिहि पाहिजे असें म्हणण्याचा परिपाठ आहे. नुसत्या शांतिनेच जर तुष्टि झाली पाहिजे असा शास्रकारांचा आशय असता तर या संकल्पांत ‘पुष्टि'हें पद घालण्याचे कांहीं कारण नव्हतें. तथापि पुष्टीची म्हणजे ऐहिकमुखाच्या अभिवृद्धीची अनावर हांव असणेहि योग्य नाहीं. म्हणून शांति, पुष्टि व तुष्टि (संतोष ) हीं तिन्ही येोग्य प्रमाणानें तुम्हास प्राप्त होवोत, व तुम्हीं मिळविलीं पाहिजेत, असा या संकल्पाचा भावार्थ आहे. कठोपनिषदाचे तात्पर्यहि असेंच आहे. नचिकेत मृत्यूच्या म्हणजे यमाच्या लोक गेल्यावर यमानें त्यास तीन वर मागण्यास सांगून त्याप्रमाणें मागितलेले वर त्यास दिले, एवढाच गोष्ट या उपानषदांत सविस्तर वर्णिली आह. पण मृत्यूनें वर मागण्यास सांगितल्यावर नचिकेतानें एकदम पहिल्यानेंच ब्रह्मज्ञान सांगा असा वर न मागतां “आपला ब प आपल्यावर रागावला आहे तो प्रसन्न होवेो” असा पहिल्यानें,व पुढे “ आग्नीचे, म्हणजे ऐहिक समृद्धि प्राप्त करून देणाच्या यज्ञादि कर्माचे, ज्ञान सांगा” असा दुसरा वर मागितला आहे; आणि हेवर प्राम झाल्यावर शेवटीं “मला