पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ፃ ፃች गीतारहस्य अथवा कर्मयोग किंवा फलाशा तेवढीच मनोनिग्रहानें सोडिली म्हणजे झाले; संन्यासमागीं म्हणतात त्याप्रमाणें सर्व विषय, कर्मे अगर सर्व प्रकारची इच्छा सेोडण्याची जरूर नाहीं; असे पुढे न्यायतःच निष्पन्न होतें. म्हणून फलाशा सोडून यथाप्राप्त विषयांचे निष्काम व निःसंग बुद्धीनें जो सेवन करितो तोच खरा स्थितप्रज्ञ होय, असें यापुढे गतेिंत सांगितले आहे (गी. २.६४)- जगांतील कर्माचा व्यवहार कधींच बंद पडत नाहीं. मनुष्य या जगांत नसला तरी प्रकृति आपल्या गुणधर्माप्रमाणें नेहमींच वहिवाटत रहाणार, जड प्रकृतीला त्याचे सुख नाहीं व दुःखहि नाहीं. मनुष्य आपल्याला नसतें महत्त्व घेऊन प्रकृतीच्या व्यापारांत आसक्त होत असल्यामुळे सुखदुःखभागी होत असतो. पण ही आसक्तबुद्धि टाकून देऊन “गुणा गुणेषु वर्तन्ते”-प्रकृतीच्या गुणधर्माप्रमाणे सर्व व्यापार चालले आहेत (गी. ३. २८)-अशा भावनेनें सर्व व्यवहार केल्यावर मग असंतेोषाचे कोणतेंच दु:ख शिल्लक रहात नाही. यासाठीं संसार दुःखप्रधान ह्मणून रडत न बसतां, किंवा त्याचा त्याग करण्याच्याहि भरीस न पडतां, प्रकृतीचे व्यापार प्रकृति करीत आहे असे समजून सुखं वा यदि वा दुःखं प्रियं वा यदि वाऽप्रियम् । प्राझे प्राप्तमुपासीत हृदयेनापराजितः ॥ “सुख असो वा दुःख असो, प्रिय असो वा अप्रिय असो, जें ज्या वेळी जसे प्राप्त होईल तें त्यावेळी तसें मनाचा हिरमोड होऊंनदेतां (म्हणजे खटूहेोऊन आपलें कर्तव्य न सोडितां)सेवीत जा ” (मभा: शां. २५.९६). असा व्यासांनी युधिष्ठिरास उपदेश केला आहे. संसारांतील कांहीं कर्तव्यें दुःख सेोसूनहिं अवश्य करावी लागतात हें लक्षांत आणिलें म्हणजे या उपदेशाचे महत्त्वपूर्ण लक्षांत येईल. भगवद्गीतँतह “यः सर्वत्रानभिलेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुमम ' (२.५७)-शुभाशुभ प्राप्त झाले असतां जो नेहमीं निःसंग असून त्याचे अभिनंदन किंवा द्वेष करीत नाहीं तोच स्थितप्रझ होय,-असें स्थितप्रज्ञाचे लक्षण सांगून पांचव्या अध्यायांत “ न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्” (५.२०) सुख पाहून फुरफुरून जाऊं नये आणि दुःखानें खटूहि होऊं नथे, आणि दुसच्या अध्यायात हीं सुखदुःखें निष्काम बुद्धीनें सँौशिली पाहेिजेत (२.१४,१५,) अॅसें म्हटले आहे; आणि दुर्सच्या ठिकाणी हाच उपदेश पुनःपुनः केलेला आह (गी. ५.९;१३.९). वेदान्तशास्राच्या परिभाषेत याला “कर्भब्रह्मार्पण करणें” हें नांव असून भक्तिमार्गौत ‘ ब्रह्मार्पणा ’ ऐवजी ‘कृष्णार्पण' हा शब्द येोजीत असतात; व हंच सर्व गीताथांचे सार होय. कर्म कोणत्याहि प्रकारचे असेो, तें करण्याची इच्छा व आपला उद्योग न सोडेिता आपणांस जें काय करावयाचें तें फलाचीं हांव न ठेवितां, परिणाम प्राप्त होणाच्या सुखदुःखांस सारखेच तयार राहून नि:संगबुद्धीने करीत गेले म्हणजे तृष्णा किंवा