पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःख विवेक ११३ असंतोष यांच्या अनिवारपणामुळे होणारे दुष्परिणाम टळतात इतकेंच नव्हे, तर तृष्णबरोबर कर्माचाहि नाश केल्यानें जग उध्वस्त होण्याचा जो प्रसंग येतो तोहि न येतां मनोवृत्ति शुद्ध राहून सर्वभूतहितप्रद होत असतात. फलाशा याप्रमाणें सेोडण्यासहि वैराग्यानें इंद्रियांचा व मनाचा पूर्ण निरोध करावा लागतो, हें निर्विवाद आहे. पण इंद्रियें ताब्यांत ठेवून स्वार्थाऐवजीं वैराग्यानें व निष्काम बुद्धीनें लोकसंग्रहार्थ त्यांना आपआपले व्यापार करूंदेणें, आणि संन्यासमागीप्रमाणें तृष्णा मारण्यासाठी इंद्रियांच्या सर्व व्यापारांचा म्हणजे कमोचा आग्रहानें समूळ नाश करणें, या दोहींमध्यें जमीनअस्मानाचे अंतर आहे. गीतेंत जें वैराग्य व जो ईद्रियनिग्रह सांगितला आह तो पहिल्या प्रकारचा आह, दुसच्या प्रकारचा नव्हे: आणि त्याचप्रमाणें अनुगीतेंत जनक-ब्राह्मणसंवादांत (मभा. अश्व. ३२. १७-२३) जनकराजा ब्राह्मणाचे रूप घेऊन आलेल्या धर्मास असें सांगत आहे का श्रृणु बुद्धिं चू' यां श्रुत्वा.सवैत्र विषयो ममू । नाहमात्माथामच्छाम गधान घ्राणागतानाप । नाहमात्मथीमच्छाम मनो नित्यं मनांतरे । मनो मे निर्जितं तस्मात् वशे तिष्ठति सर्वदा ॥ “जी (वैराग्य)बुद्धि मनांतठेवून सर्व विषयांचे मीं सेवन करितों ती तुला सांगतों, ऐक. नाकानें मी ‘आपल्यासाठा’ गैध घत नाहीं, (डोळ्यानें ‘आपल्यासाठीं’ पहात नाहीं, इ०), आणि मनहि आत्मार्थ म्हणजे आपल्या फायद्यासाठी उपयोगांत आणीत नाहीं; म्हणून माझें नाक, (डोळे इ०) व मन मी जिकलेली असून ती माझ्या ताब्यांत आोहत.” केवळ इंद्रियांच्या वृत्ति डांबून ठेवून मनानें विषयांचे चिंतन करणारा ढींगा होय, आणि मनोनिग्रहानें काम्य बुद्धीचा जय करून सर्व मनोवृत्तींस लोकसंग्रहार्थ आपआपलैं कामें करूं देणारा पुरुषच श्रेष्ठ असें जें गीतेंत म्हटलें आहे (गी. ३.६, ७), त्यांतील तात्पर्यहि असेंच आहे. बाह्य जग किंवा इंद्रियांचे व्यापार आम्हीं उत्पन्न केले नसून स्वभावसिद्ध आहेत; आणि एखादा संन्यासी कितीहि निग्रही असला तरी भूक अनिवार झाली म्हणजे तो भिक्षा मागण्यास निघतो (गी. ३. ३३); किवा फार वेळ एकाच जागीं बसला म्हणजे कांहीं वेळ उठून उभा राहतो. निग्रह कितीहि असला तरी इंद्रियांचे हे स्वाभावसिद्ध व्यापार सुटत नाहींत असें जर आपण पहातों, तर इंद्रियांच्या वृत्ती व त्याबरोबरच सर्व कर्म आणि सर्व प्रकारची इच्छा अगर असंतोष नष्ट करण्याच्या दुराग्रहांत न पडतां (गा. २. ४७; १८.५९) मनोनिग्रहानें फलाशा सोडून व सुखदुःख सारखें समजून (गी. २. ३८) निष्काम बुद्धीनं लोकोपयोगार्थ सर्व कर्म शास्रोक्तरीत्या करीत रहाणें हाच शहाणपणाचा मार्ग ठरतो. म्हणून गीी. र. ८