पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःख विवेक ፄፄ वर दिलेला श्वठोकच गौतमबुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्यावर त्याच्या मुखांतून निघाल असे म्हटले आहे::. तृष्णेचे वर सांगितलेले दुष्परिणाम भगवद्गीतेस मान्य नाहींत असें नाहीं तथापि तै टाळण्यास कर्माचा सर्वस्वी त्याग करणें उचित नाहीं, असा गीतेचा सि द्धान्त असल्यामुळे सुखदुःखाच्या वरील उपपत्तीचा येथे थोडा सूक्ष्म विचार केल पाहिजे. सर्व सुख तृष्णादि दुःखांच्या निवारणापासूनच उत्पन्न होतें, हें संन्यास मागीयांचे म्हणणेच आधीं सर्वस्वीं खरें मानितां येत नाहीं. एकदां अनुभावलेल (पाहिलेली, ऐकिलेली वगैरे) वस्तु पुनःहवीशी वाटणें याला काम, वासना किंव इच्छा असें म्हणतात; व इच्छित वस्तु लवकर न मिळाल्यामुळे दुःख होऊन ह इच्छा तीव्र होत चालली, किंवा मिळालेलें सुख पुरें न होतां आधिकाधिक हवेंस् वाटू लागलें, म्हणजे त्याच इच्छेस तृष्णा हें नांव प्राप्त होतें. परंतु नुसत्या इच्छेल अशा रीतीनें तृष्णेचे स्वरूप प्राप्त होण्यापूर्वीच जर ती इच्छा पूर्ण झाली तर तीपासून् होणारें सुख तृष्णादुःखाच्या क्षयापासून झालें असें म्हणतां यावयाचे नाहीं. उदाह रणार्थ, रोजचे वेळच्या वेळी मिळणारें जेवण घेतले तर दररोज जवण्यापूर्वी दुःखच होत असतें असा आपला अनुभव नाहीं. वळवर जेवावयास न मिळाले तर जीव भुकेनें ध्याकुळ होईल, एरवीं नाहीं. बरें; तृष्णा व इच्छा असा भेद न करित दोन्ही समानार्थक आहत असें मानिले, तरीहि सर्व सुख तृष्णामूलकच आहे हा सिद्धान्त खराठरत नाहीं.उदाहरणार्थ,एका लहान मुलाच्या तोडांतून अकस्मातूखडी मुळे झाले असे म्हणतां येत नाहीं. तसेंच वाटेनें चालत असतां मध्येंच एखादी रमणीय बाग लागून कोकिळेचा मुंजुळ शब्द कांनी पडला, किंवा वाटंत एखादं देवालय लागून त्यांतीलदेवाची सुंदर मूर्ति दृष्टीस पडली. तर त्यामुळे होणारें सुख, प्रथम सदर वस्तु प्राप्त करून घेण्याची इच्छा उत्पन्न झालेली नसतांहि, आपल्या अनुभवास यत असतं. हीं उदाहरणें लक्षांत आणिलीं म्हणजे संन्यासमार्गातील सुखाची वरीलव्याख्या सोडून देऊन इंद्रियांच्या ठायीं बन्यावाईट पदार्थाचा उपभोग घेण्याची स्वाभाविक शक्ति असून त्याप्रमाणें इंद्रियें आपआपले व्यापार करीत असतां त्यांस एखादेवेळेस अनुकूल व एखादवेळस प्रतिकूल विषय प्राप्त झाल्यानें, मूळची तृष्णा अगर इच्छा नसतांहि. आपल्याला सुखदुःख होत असतें असें म्हणावें लागतें.

  • Rockhill's Life Buddha, p 33, sasā’ afarzaqsoft join (3.3) हा श्लोक आलेला आहे. पण तो“बुद्धत्व प्राप्त होण्याच्या वेळीं बुद्धाच्या मुंखांतून निघाला वर्णन नाहीं.याबरून हे क्रोक मूळचे बुद्धाच्या मुखांतले नसावेत असें 蠶 येतें.