पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

S o o गीतारहस्य अथवा कर्मयोग हाच अभिप्राय मनांत आणून ‘मात्रास्पर्शौनी’ शीतोष्णादिकांचा अनुभव घडून सुखदुःख होतें असें गीतंत म्हटलें आहु (गी. २. १४), सृष्टींतील बाह्य पदार्थास ‘मात्रा' ही संज्ञा आहे. या बाह्य पदार्थाचा ईद्रियांशीं स्पर्श म्हणजे संयोग झाला असतां सुख किंवा दुःख या वेदना उत्पन्न होतात, असा याचा अर्थ आहे; व तोच कर्मयोगशास्राचाहि सिद्धान्त आहे. कानाला कर्कश आवाज अप्रिय कां, आणि जिहेला मधुर रस प्रिय कां, किंवानेत्रांना पौर्णिमेचे चांदणें आनंददायक कां वाटतें, याचे कारण कोणीहि सांगू शकत नाहीं. जिहेला मधुर रस मिळाला म्हणजे ती संतुष्ट होत्ये, एवढेच आपण जाणतों. आधिभौतिक सुखाचे स्वरूप याप्रमाणें केवळ इंद्रियाधीन असल्यामुळे कित्येकदां इंद्रियांचा अशा प्रकारचा नुस्ता व्यापार चालू ठेविण्यांतच सुख वाटत असतें; मग त्याचा परिणाम पुढे कांहीहि होवो. उदाहरणार्थ, एखादा विचार मनांत आला म्हणजे तोंडावाटें कधी कधीं जे शब्द सहज बाहेर पडतात, ते कांहीं कोणास आपल्या विचारांची माहिती देण्यासाठीं नसतात. उलट किंत्येकदां आपल्या स्वाभाविक व्यापारांनी मनांतील गुप्त बेत किवा मसलत बाहेर फुटून नुकसानहि होण्याचा संभव असतो. लहान मुलें प्रथम चालावयास शिकर्ली म्हणजे दिवसभर जीं उगीच इकडेतिकडे हिंडतात त्याचे कारण चालण्याच्या क्रियेंतच त्यांना त्यावेळीं मौज वाटत्ये हें होय. म्हणून यच्चावत् सर्व सुखदःखाभावरूपच आह असें न म्हणतां “इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवಛಿ।ಿಘೀ विषय यांच्यामधील आवड ब द्वेष हीं दोन्हीहि ‘व्यवस्थित' म्हणजे मूळचींच स्वतंत्रसिद्ध आहत्असे सांगून, हे व्यापार आत्म्याच्या कल्याणाचे कसे होतील किंवा करून घेतां येतील ऐवढेच कायतें आपणांस पहाणे आहे, व त्यासाठीं इंद्रियांच्या व मनाच्या वृति मारण्याच्या भरीस न पडतां, सदर वृत्ति आपल्या फायद्याच्या होण्यास इंद्रियें व मन आपल्या ताब्यांत ठेवा, स्वैर होऊंदेऊं नका, असा भगवैतांचा उपदेश आहे. हा उपदेश, आणि तृष्णा किंवा तृष्णेबरोबरच इतर सर्व मनोवृति समूळ नाहींशा अजीबात नाहींसा करावा असें गीतेचे तात्पर्य नसून, उलट अठराव्या अध्यायांत (१८. २६) कत्र्याचे अंगों समबुद्धिबरोबरच धृति व उत्साह हे गुण पाहिजेत, असें गीताशास्र सांगत आहे, परंतु याबद्दल अधिक विवेचन पुढे करूं. सध्यां सुख व दुःख या दोन भिन्न वृत्ती आहेत किंवा त्यापैकी एक दुसरीचा अभाव आहे एवढेच आपणांस पाहणें आहे; व या बाबतींत भगवद्गीतेचा अभिप्राय काय आह हें वरील विवचनावरून वाचकांचे ध्यानांत येईल. ‘क्षेत्र' म्हणजे काय हें सांगतांना ‘सुख’ आणि दुःख' यांची पृथक् पृथक् गणना केली आहे (गी. १३. ६) इतकंच नव्हे,