पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*.と गीतारहस्य अथवा कर्मयोग तृष्णार्तप्रभवे दुःखे दुःखर्तिप्रभवं सुखम् । “कोणती तरी तृष्णा आधीं उत्पन्न होऊन तिच्या पीडेपासून दुःख आणि त्या दुःखाच्या पीडेपासून पुढे सुख उद्भवतें”-असें जें सुखदुःखांचे वर्णन आहे, तेंच यथार्थ होय असें म्हणावें लागेल (शां. २५. २२; १७४.१९.) सारांश, मनुष्याचे मनांत प्रथमतः एखादा आशा, वासना अगर तृष्णा उत्पन्न होऊन तीपासून दुःख होऊँ लागल्यावर मग सदर दुःखाचें जें निवारण होतें तें सुख होय, सुख म्हणून निराळी स्वतंत्र वस्तु नाहीं, असें या पंथाचे म्हणणे आहे. किंबहुना मनुष्याच्या संसारांतील सर्व प्रवृत्ति वासनात्मक किंवा तृष्णात्मकच असून सर्व सांसारिक कर्मचा त्याग केल्याखेरीज तृष्णचा पुरा बींमोड होत नाहीं, व तृष्णेचा पुरा बीमोड झाल्याखेरीज खच्या व नित्य सुखाची प्राप्ति होणेहि शक्य नाही, असें यापुढे दुसरेंहि अनुमान या पंथांतील लोकांनी काढिलेले आहे. बृहदारण्यकांत विकल्पानें (बृ.४.४. २२: वेसू. ३. ४. १५) आणि जाबाल-संन्यासादैि उपनिषदांतून मुख्यत्वानें हाच मार्ग प्रतिपाद्य असून, अष्टावक्रगीतेंत (९.८:१०.३-८)व अवधूतगीतंत(३.४६) याचाच अनुवाद केलेला आहे. ज्याला आत्यन्तिक सुख किंवा मोक्ष प्राप्त करून घ्यावयाचा आहे त्यानें होईल तितक्या लवकर संसार सोडून संन्यास घेतला पाहिजे हा या पंथाचा अखेरचा सिद्धान्त होय; आणि स्मृतिग्रंथांत वर्णिलेला व श्रीशंकराचार्यानी कलियुगांत स्थापिलेला श्रौत-स्मार्त-कर्म-संन्यासमागै याच तत्त्वावर निघालेला आहे. उघडच आह कीं, सुख म्हणून जर कांहीं वास्तविक पदार्थ नाहीं, जें काय आह तें दु:ख आणि तेंहि तृष्णामूलक, तर हे तृष्णादि विकारच प्रथमतः समूळ खणून काढिले म्हणजे स्वार्थाची किंवा परार्थाची सर्व कटकट नाहींशी होऊन मनाची मूळ साम्यावस्था किंवा शान्ति एवढीच काय ती शिल्लक राहिली पाहिजे; आणि याच आभप्रायानें महाभारतान्तैगत शांतिपर्वोतील पिंगलगीतेंत व त्याचप्रमाणे मंकिगर्तेितहि- . यश्च कामसुखं लेोके यच्च देवयं मह्त् सुखम् । तृष्णाक्षयसुखस्यैते नाहृत: षोडीिं कलाम् । “इहलोकों काम म्हणजे वासना यांच्या तृप्तीनें होणारें जें सुख, आणि स्वर्गामधलें जें मोठे सुख, त्या दोन्ही सुखांची योग्यता तृष्णाक्षयापासून होणाच्या सुखाच्या सोळाव्या कलेइतकी म्हणजे हिशाइतकीहि नाहीं,” असे म्हटले आहे (शां. १७४. ४८. १७७.४९). वैदिक संन्यासमागांचेच पुढे जैन व बौध धर्मात अनुकरण केलेलें आहे. म्हणून या दोन्ही धर्माच्या ग्रंथांतून तृष्णेच्या दुष्परिणामांचे व त्याज्यतेचे वरच्याप्रमाणे-किंबहुना कांकणभर जास्त सरस-वर्णन केलेले असतें (उदाहरणार्थ धम्मपदांतील तृष्णावगं पहा). तिबेट देशांतील बौद्धधर्मग्रंथांत तर महाभारतांतला