पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

& o गीतारहस्य अथवा कर्मयोग बुद्धिभेदामुळे एक दान सात्त्विक, तर दुसरें राजस किंवा तामसहि होऊंशकेल, असें गीतेंत म्हटलं आहे. पण याबद्दल जास्त विचार पुढे पौर्वात्त्य व पाश्चात्य मतांची तुलना करितांना करूं. कर्माच्या केवळ बाह्य परिणामावरच अवलंबून राहणाच्या आधिभौतिक सुखवादाची श्रेष्ठ पायरीहि नीतिानर्णयाचे काम कशी अपुरा पडत्य एवढेच सध्यां पहाणे असून, मिल्लची वरील कबूली हाच आमच्या मतें याचा उत्तम पुरावा आह. - “पुष्कळांचे पुष्कळू सुख”या आधिभौतिक पंथांतकत्र्याच्या बुद्धीचा कांहींच विचार होत नाही, हॉ सर्वात मोठा दोष होय. कारण, मिल्लची कोटी खरी मानिली तरीहिकेवळ बाह्य फलावरून नतिीचा निर्णय करणारें हें तत्त्व कांही मर्यादेच्या अांत लागूं पडणारें म्हणजे एकदेशीय असून, त्याचा सर्व ठिकाणी एकसारखा उपयोग करितां यत नाहीं हें मिल्लच्या लेखावरूनच सिद्ध हेोतें. पण याशिवाय या मताबूर आणखहि एक आक्षेप असा आह कीं, स्वार्थीपेक्षां परार्थ श्रेष्ठ कां किंवा कसा ठरतो याची कांहींच उपपति न सांगतां हें तत्त्व गृहीत धरून सर्व विचार केला असल्यामुळे शहाण्या स्वार्थास आपलें घोडें पुढे ढकलण्यास सवड मिळाली आहे. स्वार्थे अििण परार्थे ह्रीं दीन्ह्रीं तत्त्वे मनुष्याबरोबर् उपजतश्च जर् निमीण झालेलीं आहत, तर स्वार्थापेक्षां पुष्कळांचे हित मी जास्त महत्त्वाचे कां मानावें ? पुष्कळ लेोकांचे पुष्कळ हित त्यांत आहे म्हणून तूं तसे कर हें उत्तर समर्पक नाहीं; कारण, पुष्कळ लोकांचे पुष्कळ हित कां करूं, हाच मूळचा प्रश्न आहे. लोकांचे करण्यांतच प्रायः आपलेंहि हित असल्यामुळे हा प्रश्न नेहमीं उपास्थत होत नाहीं, हें खरें. पण आधिभौतिक पंथाच्या वर सांगितलेल्या तिसच्या पायरीपेक्षां या शेवटच्या म्हणजे चवथ्या पायरीत जो फरक आहे तो हा की, स्वार्थ आणि परार्थ यांचा विरोध आला तर शहाण्या स्वार्थाचा मार्ग न पत्करितां स्वार्थ सेोडून पराथै साधण्यास झटणें हंच प्रत्येकाचें कर्तव्य असें या शेवटच्या पंथांतील लोक मानितात. हा जो या आधिभौतिक पंथांतील विशेष त्याची कांहीं उपपात दाखवावयास नको काय ? ही अडचण या पंथाच्या एका विद्वान् आधिभौतिक पंडिताच्या लक्षांत येऊन लहान किड्यापासून तों मनुष्यापर्यंत सर्व सजीव प्राण्यांच्या व्यवहारांचे निरीक्षण करून त्यानें अखेर असा सिद्धान्तकाढिला आहे कीं, ज्या अथ आपल्याप्रमाणेच आपल्या संततचेि वज्ञ तीचे परिपोषण करणे आणि कोणाला इजा न करितां आपल्या बांधवांस होईल तितकी मदत करणें हा गुण लहान किड्यापासून मनुष्यापर्यंत उत्तरोत्तर आधिकाधिक व्यक्त होत चाललेला आढळून येतो, त्या अर्थी सजीव सृष्टीच्या वर्तनाचें हेंच मुख्य धेोरण आहे, असे म्हटले पाहिजे. सजीव सृष्टींत हें धेोरण प्रथमतः संतति उत्पन्न करणे आणि तिचे