पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधिभौतिक सुखवाद ९१ संगेोपन करणें या गोष्टीत दिसून येतें. स्रीपुरुष हा भेद ज्यांच्यांत झालेला नाहीं, अशा अत्यंत सूक्ष्म किडयांच्या सृष्टींतदेखीलएका किडयाचा देह वाढतां वाढतां तो फुटून त्याचे दोन किडे बनतात; किंवा संततीसाठी म्हणजे परक्यासाठी हा लहान किडा आपला देह विसर्जन करितो म्हटलें तरी चालेल. तसेंच सजीव सृष्टींत या किडयाच्या वरच्या वरच्या पायरीचे स्रीपुरुषात्मक प्राणीहि याचप्रमाणे आपल्या संततांच्या संगोपनार्थ स्वार्थत्याग करण्यांत आनंद मानीत असतात; आणि हा गुण पुढे वाढत जाऊन अगदीं रानटी समाजांतहि मनुष्य आपल्या संततीलाच नव्हे, तर आपल्या ज्ञातिबांधवांनाहि मदत करण्यास सुखानें प्रवृत्त होत असतो. म्हणून सजीव सृष्टीचा शिरोमणि जेो मनुष्य त्यानें परार्थीतच स्वार्थीप्रमाणें सुख मानण्याचे सृष्टीचे हें चढतं धोरण पुढे चालवून स्वार्थ व परार्थ यांच्या दरम्यान सध्यां भासणारा विरोध कायमचा काढून टाकण्याचा प्रयत्न करावा, हेंच या जगांतील त्याचे इतिकर्तव्य होय.४ युक्तिवाद बरोबर आहे. परोपकार हा सद्गुण मुक्या सृष्टींतहि पोरांचे संगोपन करण्यांत नजरेसयेत असल्यामुळे ज्ञानवान् मनुष्यानें त्यांचा परमावधि करावी हाच त्याचा पुरुषार्थ आहे, हें तत्त्व कांहा नवें नाहीं. आधिभौतिक शास्रांचे ज्ञान हल्लीपुष्कळ वाढल्यामुळे या तत्त्वाची आधिभौतिक उपपत्ति आतां अधिक संगतवार मांडितां आली एवढेच काय तें अधिक होय. आमच्या शास्त्रकारांची दृष्टेि आध्यात्मिक आहे, तरीहिं प्राचीन ग्रंथांतून अष्टादशपुराणानां सारं सारं समुद्धृतम् । परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ॥ “परोपकार हेंपुण्य आणि परपीडाहें पाप, एवढेच काय तें अठरा पुराणांचे सार हेोय” असे म्हटलें आह; आणि भर्तृहरिहि“स्वार्थो यस्य परार्थ एव स पुमान् एकः सतां अग्रणी:”-परार्थ हाच ज्याचा स्वार्थ झाला तोच सर्व सत्पुरुषांत श्रेष्ठ होय-असें सांगत आहे. परंतु लहान किड्यापासून मनुष्यापर्यंत सृष्टीची उत्तरोत्तर चढती पायरी लक्षांत आणिली म्हणजे दुसरा असाहि प्रश्न निघतो की, परोपकारबुद्धि या एकाचसद्गुणाचा मनुष्यांतूउत्कूर्ण झालेला आहे, किंवा त्याबरोबरचू न्यायबुद्धि, दया, शहाणपण, दूरदृष्टि, तर्क, शैौर्य, धृति, क्षमा, इंद्रियनिग्रह इत्यादि दुस-या अनक सात्त्विक सद्गुणांचीहि वाढझाललै आहे? हा विचार मनांत आला म्हणजे, इतर सजीव प्राण्यांपेक्षां मनुष्यांत सर्वच सद्गुणांचा उत्कर्ष झाला आहे असे म्हणणें

  • ही उपपत्ति स्पेन्सरच्या Data gfétAtc*या ग्रंथांत दिलेली आहे. आपल्या च मिल्लच्या मतामध्यें अंतर काय याचा खुलासास्पेन्सरसाहेबांनीं मिल्लला पाठविलेल्या पत्रांत केला असून या पत्रांतील उतारे सदरहूँग्रंथांत दिलेले आहेत. pp. 57, 128. Also see Bain's Mental and moral Scienre pp. 721, 722 (Ed. 1875).