पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधिभौतिक सुखवाद く"A नाहीं म्हणून उजेड ज्याप्रमाणे त्याज्य असें कोणी म्हणत नाहीं, त्याप्रमाणें कांहीं विशिष्ट लोकांस एखादी गोष्ट फायदेशीर नसल्यास ती सर्वास हितावह नाही असे कर्मयोगशास्रांतहि म्हणतां येत नाही; आणि याच कारणास्तव “सर्व लोकांचे सुख” या शब्दाचाच “पुष्कळांचे पुष्कळसुख” असा आतां अर्थ करावा लागतो. सारांश, “पुष्कळ लोकांस जेणेकरून पुष्कळ सुख होईल तीच गोष्ट आपण नीतिदृष्टया न्याय्य व ग्राह्य समजली पाहिजे; आणि अशा रीतीनें वर्तन करणे हेंच या जगांत मनुष्याचे खरं कर्तव्य होय,” असें या पंथाचे मत आह. आधिभौतिक सुखवाद्यांचे हें तत्त्व आध्यात्मिक पंथास कबूल आहे; किंबहुना हें तत्त्व आध्यात्मिकवाद्यांनीच फार प्राचीन काळी शोधून काढिलेलें असून आधिभौतिकवाद्यांनी आतां त्याचा एका विशिष्ट रीतीनें उपयोग केला, एवढाच भेद आहे असें म्हणण्यासहि हरकत नाही.तुकोबांनी म्हटल्याप्रमाणें, “जगाच्या कल्याणा संताच्या विभूती । देह कष्टविती उपकारें ॥” हें कांहीं कोणास सांगावयास नको. अर्थात् या तत्त्वाच्या खरेपणाबद्दल किंवा येोग्यतेवद्दल कोणताहि वाद नाही. खुद्द भगवद्गीतंतहिं पूर्ण योगयुक्त अर्थातू कर्मयोगयुक्त ज्ञानी पुरुषाची लक्षणें सांगतांना “ सर्वभूतहिते रताः ” म्हणजे सर्व भूतांचे कल्याण करण्यांत ते गढलेले असतात, असें दोनदां स्पष्ट म्हटलें आह (गी. ५.२५; १२.४); आणि धर्माधर्माच्या निर्णयाथैहिं आमचे शास्रकार हें तत्त्व जुमेस धरीत असत, असें दुसच्या प्रकरणांत दिलेल्या “यद्भूतहितमत्यन्संतृत्सत्यमिति धारणा ” या महाभारतांतील वचनावरून उघड होतें. पण आमचे शास्रकार म्हणतात त्याप्रमाणें सर्वभूतहित हें ज्ञानी पुरुषांच्या वर्तनाचें बाह्य लक्षण ठरवून धर्माधर्मनिर्णयाथै त्याचा प्रसंगविशेष स्थूल मानानें उपयोग करणे, आणि नीतिमतेचे हेंच काय तें सर्वस्व मानून दुसच्या कोणत्याहि गोष्टींचा विचार न करितां केवळ याच पायावर नीतिशास्राची सर्व टोलेजंग इमारत उभारणे, या दोन गोष्टी अत्यंत भिन्न आहेत. आधिभौतिक पंडित दुसरा मार्ग स्वीकारून नीति म्हणून त्यांचे हें म्हणणें कितपत सयुक्तिक आहु हें आपणांस आतां पाहिले पाहिजे. ‘सुख’ आणि ‘हित’ या दोन शब्दांच्या अर्थात बराच भेद आहे, पण सध्यां तो भेद जरी बाजूला ठेविला आणि ‘सर्वभूतहित’ म्हणजे “पुष्कळ लोकांचे पुष्कळ सुख” असें घेऊन चालले, तरी कार्याकार्यनिर्णयाच्या कार्मी केवळ या तत्त्वाचा उपयोग केला तर अनेक महत्त्वाच्या अडचणी उत्पन्न होतात असे दिसून येईल. समजा कीं, या तत्त्वाचा आधिभौतिक पुरस्कर्ता अर्जुनास उपदेश करण्यास असता तर त्याने त्यास काय सांगितले असतें? भारती युद्धांत तुम्हांस जय मिळाल्यानें पुष्कळ लोकांस जर पुष्कळ सुख होण्यासारखें असेल, तर भीष्माला मारूनहि युद्ध